डॉ. मनोज अणावकर

माणूस म्हातारा झाल्यावर त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जसं जाळं पसरतं, तसं इमारतीच्या पृष्ठभागावर आणि बीम-कॉलमवरही अनेकदा भेगा किंवा तडे यांचं जाळं पसरलेलं दिसतं. मात्र, इमारत फारशी जुनी नसली, तरी अनेकदा अशा भेगा किंवा तडे गेलेले दिसतात. कधी या भेगा एकटय़ादुकटय़ा असतात, तर कधी इमारतीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर बारीक भेगांचं जाळंच पाहायला मिळतं. हे नेमकं कशामुळे घडतं, हे जाणून घ्यायचं असेल तर या भेगांच्या माध्यमातून इमारत आपल्याला जे काही सांगू पाहते आहे, ती तिची भाषा आपण जाणून घेतली पाहिजे. तान्हं बाळ भूक लागली तरी रडतं आणि आणि कुठे दुखतखुपत असेल तरी रडतं. परंतु नेमकं कुठलं रडू कोणत्या कारणासाठी आहे, हे जसं त्याच्या आईला समजतं, तसंच इमारतीची ही भाषा जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर कुठल्या भेगा

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

कोणत्या कारणांमुळे पडल्या आहेत, ते कळल्यावर आपण त्यांच्यावर उपाय शोधू शकतो.

आकृती १ मध्ये दाखवल्याप्रमाणे जर कॉलमजवळ बीमला उभे तडे गेले असतील, तर याचा अर्थ, कॉलमजवळ असलेल्या बीमच्या सांध्यापाशी  shar force अर्थात, कर्तन बलामुळे उभे तडे जाऊन तुटू नये यासाठी या सांध्याजवळ बीमच्या आत असलेल्या स्टिरप्स (उभ्या लोखंडी सळय़ा) या गंजायला सुरुवात झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सळय़ा बदलण्याची गरज आहे किंवा खराब झालेल्या भागात नवीन सळय़ांचा भाग जोडून घ्यावा लागतो. बीमच्या संपूर्ण लांबीवर जर उभे तडे गेले असतील, (आकृती २ पाहा) तर सगळय़ाच स्टिरप्स गंजायची प्रक्रिया सुरू झालेली असू शकते. कॉलमला जर उभे तडे जाऊन मध्यभागाजवळ किंवा पायाजवळ कॉलम जर थोडासा फुगीर झाला असेल, (आकृती ३) तर कॉलममधील काँक्रीट जुने होऊन कॉलमची वजन तोलून धरण्याची क्षमता कमी झालेली असू शकते. जर कॉलमवर केवळ उभे तडे काही भागातच गेले असतील, (आकृती ४) तर कॉलमच्या मुख्य उभ्या सळय़ा गंजायला सुरुवात झालेली असू शकते. कॉलमवर तिरप्या भेगा किंवा तडे गेले असतील, (आकृती ५) तर कॉलमच्या आतल्या लिंक्स (आडव्या सळय़ा) गंजायला सुरुवात झालेली असू शकते. कॉलम-बीमच्या सांध्यापाशी बीमखाली कॉलमवर आडव्या भेगा गेल्या असतील, तर तिथल्या स्टिरप्स किंवा बीममधून कॉलममध्ये येणाऱ्या सळय़ांची गंजायची प्रक्रिया सुरू झालेली असू शकते. अशा विविध ठिकाणी इमारतीत तडे किंवा भेगा जाऊ शकतात. तेव्हा त्यामागची नेमकी कारणं शोधून त्यानुसार त्यावर उपाय करण्याची गरज असते.

इमारतींची संरचना आणि बांधकामाचा दर्जा चांगला असेल, तर बऱ्याच वर्षांपर्यंत त्यात वापरल्या गेलेल्या काँक्रीटमधल्या सळय़ांना कुठलाही धोका उद्भवत नाही. परंतु जर बांधकाम किंवा संरचना सदोष असेल, तर सुरुवातीपासूनच इमारतीत विविध ठिकाणी असणाऱ्या भेगांमधून हवा-पाणी यांचा या सळय़ांशी संबंध येतो आणि मग सळय़ा गंजण्याची प्रक्रिया वेग घेते. काँक्रीटमध्ये असलेलं अल्क या सळय़ांना संरक्षक कवच पुरवत असतं. या अल्काचं प्रमाण इमारतीच्या वयोमानानुसार कमी होत जातं. वातावरणातला कार्बनडाय ऑक्साईड हा वायू आणि आद्र्रता याचाही काँक्रीटवर परिणाम होतो. याला काबरेनेशन म्हणतात. त्यामुळे काँक्रीटचा पृष्ठभाग काळा पडायला लागतो (छायाचित्र क्र. १ पाहा). तसंच वर्षांनुर्वष ऊन, वारा, पाऊस यांचे हल्ले काँक्रीट झेलत असतं. या सर्वाचा एकत्रित परिणाम आधी काँक्रीटवर होतो आणि मग आतल्या सळय़ांवर होतो. सळय़ा गंजल्यावर त्यांच्या आकारमानात वाढ होते आणि काँक्रीटच्या आत असलेल्या या सळय़ांचं आकारमान वाढलं की, त्याचा ताण त्यांच्या सभोवताली असणाऱ्या काँक्रीटवर पडून त्याला तडे जातात.

इमारतही माणसाप्रमाणेच काळाबरोबर खंगत जाते. म्हणूनच वेळोवेळी योग्य ते उपचार करून इमारत शक्य तितक्या सुस्थितीत राखायचा प्रयत्न केला, तर इमारतीचं आयुष्य थोडं अधिक काळपर्यंत लांबवलं जाऊ शकतं आणि त्याद्वारे आपण आपलं घर आणि आपला जीवही सुरक्षित ठेवू शकतो.

तडे गेलेल्या भिंतींवर खाली दिलेले उपाय करावेत

* तडे गेलेल्या काँक्रीटचं स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून परीक्षण करून घ्यावं :

* आतल्या सळय़ांचं गंजण्याचं प्रमाण किती आहे, ते अशा परीक्षणातून जाणून घ्यावं.

*  इमारतीच्या नक्की किती आणि कुठल्या भागांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे, याची माहिती या परीक्षणातून घ्यावी.

* ज्या भागांची दुरुस्ती करायची त्या भागांवरचं काँक्रीट सळय़ा दिसेपर्यंत काढलं जातं.

*  सळय़ांचा गंजलेला भाग धारदार चाकूने किंवा एखाद्या तीक्ष्ण हत्याराच्या साहाय्याने घासून काढला जातो आणि त्या जागी तेवढय़ा भागात नव्या सळय़ा घातत्या जातात.

*  सळय़ा किती गंजल्या आहेत, त्यानुसार दुरुस्तीची कुठली पद्धत अवलंबायची ते ठरवावं.

*  नवीन सळय़ांना आणि जुन्या सळय़ांच्या दिसत असलेल्या भागाला गंजविरोधी रसायन लावलं जातं.

*  मग त्यावर पॉलिमरयुक्त काँक्रीटचा थर दिला जातो. अशा प्रकारे गंजलेल्या सळय़ांचा काँक्रीटमधला भाग दुरुस्त करून घेतला जातो.

*  सळय़ा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गंजलेल्या असतील आणि काँक्रीटची स्थिती खूपच खराब असेल, तर मात्र, तो काँक्रीटचा भाग नव्याने बांधून काढावा लागतो. त्याला जॅकेटिंग असं म्हणतात.

(इंटिरिअर डिझाइनर आणि सिव्हिल इंजिनीअर)

 anaokarm@yahoo.co.in