क्लासिक ख्रिसमस थीम

या ख्रिसमसमध्ये तुमच्या घराला उत्कृष्ट मेकओव्हर द्या! कौटुंबिक कार्यक्रम, लाइटस्, डेकोरेशन आणि गिफ्टसशी नाताळचे चतन्य जुळलेले आहे. जरी नाताळ ख्रिश्चन कॅलेंडरचा महत्त्वाचा सण असला तरी राष्ट्रामध्ये तो सार्वभौमिक सण म्हणून साजरा केला जातो. या सणात तुम्ही तुमच्या बच्चेकंपनीसाठी तुमच्या घराला …

या ख्रिसमसमध्ये तुमच्या घराला उत्कृष्ट मेकओव्हर द्या! कौटुंबिक कार्यक्रम, लाइटस्, डेकोरेशन आणि गिफ्टसशी नाताळचे चतन्य जुळलेले आहे. जरी नाताळ ख्रिश्चन कॅलेंडरचा महत्त्वाचा सण असला तरी राष्ट्रामध्ये तो सार्वभौमिक सण म्हणून साजरा केला जातो. या सणात तुम्ही तुमच्या बच्चेकंपनीसाठी तुमच्या घराला आदर्श सौंदर्यात्मक गोष्टींनी सजवता. रंगाची योग्य छटा उत्साहपूर्ण, आनंददायी आणि मनमोहक बनवत तुमच्या नाताळ सजावटीला प्रतििबबित करेल. हा लूक भिन्न रंगांच्या छटांना एकरूप करून मिळविला जाऊ शकतो, ज्यामध्ये फíनिशग्ज आणि फॅब्रिक्सचे मिश्रण असेल. या सणासाठी खास तुमच्या घराच्या मेकओव्हरसाठी तुम्ही खाली दिलेल्या थीम्स प्रायोगिक तत्त्वावर अनुभवू शकता. क्लासिक ख्रिसमस थीम नाताळासाठी तुमचे घर अधिक खास दिसलेच पाहिजे. सोनेरी आणि चंदेरी छटेसोबत अ‍ॅडव्हेंचर २१८९सारखी रिच रेड आणि िवटर व्हाइट २६८० सारखी व्हाइट रंगाची स्किम डेकोरेशन्स आणि टेबलवेअरसाठी हॉली व ख्रिसमस ट्रीच्या छटांची परिपूर्ण शोभा आणतील. भव्य आणि अनोखे सेट-अप देण्यासाठी चंदेरी व सोनेरी रंगाच्या कँडलस्टिक आणि कटलरीसोबत लाल व सफेद चौकडीच्या कापडाने तुमच्या टेबलाची सजावट करा.
िव्हटेज फेअरीटेल थीम : िव्हटेज फेअरीटेल इंटेरियर्स व्हिक्टोरियन डिझाइनने सादर करा, जी नाताळासाठी मोहक सजावट ठरेल. या थीमचे वैशिष्टय़ म्हणजे फिक्या रंगासोबत अँजेलिका िपक-२२२०, लवेंडर हेज-२३११, लिरीक ब्ल्यू  २४५६, पर्सयिन बिज -२७८६, रोज अ‍ॅश – २२०४ सारख्या पेस्टल छटेसोबत घरांच्या िभती पेंट केल्या जाऊ शकतील. ताज्या पेस्टल रंगांची फुले आणि लिनेनसोबत अनोख्या व गडद फíनिशगने याची शोभा अधिक वाढवता येऊ शकते. मंद प्रकाशासोबत नाताळासाठी व्हिक्टोरियन सिल्व्हर ख्रिसमस गिफ्ट्स आणि सँटा दागिने घरगुती फेअरीटेल सेटिंग निर्माण करेल, जे घराला आदर्श लूक देईल.
रॉयल थीम : राजेशाही लूक येण्यासाठी गोल्ड (रा गोल्ड – २०४२)च्या वार्म ओव्हरटोन्ससोबत खासकरून लाइम २६५५, गार्डन लँडस्केप – ४३८१ आणि सेज – २६४९ एकत्र करून ऑलिव्ह ग्रीन छटेचादेखील तुम्ही वापर करू शकता. निसर्गाशी, जीवन आणि समृद्धतेचा द्योतक असलेला हिरवा रंग हा यश आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. हस्तिदंतावर सॉफ्ट गोल्ड रंगांचे रिबन्स आणि ख्रिसमस ट्रीवर ऑलिव्ह शेडेड दागिने आणि गिफ्टस् निसर्गाच्या काही वास्तविक छटा आणण्यात मदत करतील.
या सणाच्या मोसमात तुमच्या प्रियजनांना वॉल गिफ्ट करा, जी त्यांना खास फिल देईल. तुमच्या घरातील उत्कृष्ट कोपरा निवडून ट्रेन्डी वॉल पेंटकरून तुम्ही ही क्लासी सिग्नेचर वॉल तयार करू शकतात. कुटुंब, मित्र-मत्रिणींसोबतच्या खास क्षणांचा कोलाज करून तुम्ही या वॉलला अधिक शोभा आणू शकता.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Classic christmas theme

Next Story
वास्तुप्रतिसाद :
ताज्या बातम्या