मनोज अणावकर

आपण गेल्या भागात फॉल्स सीलिंगच्या बांधकामाची प्रक्रिया बघितली. घरातचं सौंदर्य खुलवणारी दुसरी महत्त्वाची आणि गृहिणींच्याच नव्हे, तर सर्वाच्याच जिव्हाळ्याची असलेली खोली म्हणजे स्वयंपाक घर आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकाचा ओटा! हा ओटा बांधायची प्रक्रिया जाणून घेतानाच तो बांधत असताना कोणती काळजी घ्यायची याविषयी आपण या भागात जाणून घेणार आहोत.  स्वयंपाकाच्या ओटय़ाच्या बांधकामाची प्रक्रिया आता आपण पाहूया –

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

१. ओटा बाहेरून दर्शनी भागात जरी ग्रॅनाईटचा दिसत असला, तरी त्याचा आतला गाभ्याचा भाग म्हणजे कप्पे करण्यासाठी वापरले जाणारे उभे आणि आडवे दगड हे मात्र संगमरवर किंवा कडप्पा दगडात केले जातात. कारण संपूर्णपणे हे आतले कप्पेसुद्धा ग्रॅनाईट दगडात करणं हे खूपच खíचक होईल.

२. ओटा जिथे येणार आहे, तिथे जमिनीवर २ ते ३ इंच जाडीचा दगड तळाला बसवून घ्यायचा आणि मग त्यावर ओटा बांधायचा. हे अशासाठी गरजेचं आहे, कारण आतल्या ज्या स्टीलच्या ट्रॉलीज येणार आहेत, त्या थेट जमिनीवर आल्या तर फ्लोअिरगवर राहतील आणि त्यामुळे फ्लोअिरगच्या लाद्यांना घासल्या जातील. तसंच, ओल्या फडक्याने जागा पुसताना लाकडी दरवाजाच्या खालच्या बाजूला रोज पाणी लागून तो खराब होऊ शकतो. त्यामुळे हा तळाचा दगड फ्लोअिरगच्या लाद्या आणि दरवाजांना अधिक काळपर्यंत सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत करतो. ओटय़ाच्या दोन्ही बाजूला शेवटी असलेले उभे दगड हे तळाच्या दगडापेक्षा दीड इंच बाहेर काढून बसवले जातात. कारण या दीड इंचाच्या गॅपमध्ये ओटय़ाच्या ट्रॉलीजचे दीड इंच जाडीचे प्लायवूडचे दरवाजे बसतात. (सोबतची आकृती ‘अ’ पाहा) या तळाच्या दगडाला सिंकच्या दिशेने उतार दिला जातो. कारण यावर जेव्हा ओटा बांधून त्याचा मुख्य जेवण करायचा दगड घातला जाईल, तेव्हा त्यालाही आपोआपच तळाच्या दगडाचा उतार प्राप्त झाल्यामुळे ओटय़ावर जमा होणारं पाणी सिंकच्या दिशेने वाहून जायला मदत होईल.

३. ज्या भिंतीपाशी ओटा घालायचा आहे, त्या भिंतींवरती  ओटय़ाच्या कप्प्यांबाबतचं आरेखन पेन्सिलने करून घ्यायचं आणि मग त्यात दगडाच्या जाडीएवढय़ा रूंदीचं साधारण एक ते दीड इंच खोल असं खोदकाम भिंतीत करून घ्यायचं, म्हणजे कप्प्याचे उभे दगड त्या खाचांमध्ये भिंतीत व्यवस्थित बसवता येतील. तळाच्या दगडातही हे उभे दगड बसवण्यासाठी खाचा करून घ्यायच्या (सोबतची आकृती ‘अ’ पाहा)

४. या खाचांमध्ये मग कप्प्याचे उभे दगड बसवायचे. जिथे दगडाचे दोन किंवा अधिक आडवे कप्पे करायचे आहेत, अशा ठिकाणी दोन्ही बाजूच्या उभ्या दगडांना आडव्या खाचा करून त्यात हे आडवे दगड बसवायचे. (सोबतची आकृती ‘ब’ पाहा.)

५. एकदा का कप्प्यांचे सगळे उभे आणि आडवे संगमरवर किंवा कडाप्पाचे दगड बसवून झाले की, मग त्यावर याचप्रकारचा दगड हा ओट्याच्या मुख्य ग्रॅनाईटच्या दगडाला आधार देण्याकरता घातला जातो. (सोबतची आकृती ‘क’ पाहा.) हा दगड त्या जागेवर बसवण्याआधी त्याला स्टेनलेस स्टीलच्या सिंकच्या आकाराचं भोक पाडून घेतलं जातं.

६. हा दगड बसवून झाला की मग सिंकचा समोरचा भाग झाकण्याकरता समोरून आडवा दगड बसवला जातो. (सोबतची आकृती ‘क’ पाहा.)

७. यात स्टेनलेस स्टीलचं सिंक व्यवस्थित बसवून घेतलं जातं.

८ या सगळ्यावर त्यानंतर ग्रॅनाईटचा ओटय़ाचा मुख्य दगड बसवला जातो. तो नीट घट्ट बसावा याकरता वर मुद्दा क्रमांक ५ मध्ये उल्लेखलेल्या आणि आधार देण्याकरता घातलेल्या संगमरवर किंवा कडाप्पाच्या दगडावर रेती आणि सीमेंटचा जाड थर घातला जातो. यामुळे स्टीलच्या सिंकचे काठही व्यवस्थित ओटय़ाच्या या दोन्ही आडव्या दगडांच्यामध्ये घट्ट सांधले जातात. त्यामुळे या काठांच्या कडेने होणारी पाण्याची गळती रोखली जाते. (सोबतची आकृती ‘ड’ पाहा.)

९. एकदा का ओटय़ाचं बांधकाम झालं की, मग ओटय़ामागच्या टाइिलगचं काम केलं जातं. (सोबतची आकृती ‘इ’ पाहा.) त्यानंतर मग ओटय़ाखालच्या ट्रॉलीजचं काम केलं जातं आणि त्यांना तसंच ड्रॉवर्सना समोरच्या बाजूने प्लायवूडचे दरवाचे बसवून त्याला सनमायका लावली जाते व त्यावर विविध प्रकारचे आकर्षक हँडल्स बसवले जातात.

१०. अशाप्रकारे सुंदर सनमायका, हँडल्स आणि विविध आकारांच्या कप्प्याच्या दरवाजांमुळे आणि मागच्या टाइल्स तसंच धूर वाहून नेणाऱ्या चिमणीमुळे तयार झालेला ओटय़ाचा देखणा लूक मन मोहून टाकतो.