सण, समारंभ आणि उत्सव हे आनंद, प्रकाश आणि उत्साह घेऊन येतात. मात्र या आनंदात विद्युत रोषणाईकडे दुर्लक्ष झाले, तर हाच आनंद गंभीर अपघातात बदलू शकतो.गणेशोत्सव दोनदिवसांवरआलाय.त्यानंतर दसरा, लग्न समारंभ, जत्रा, मेळे, मिरवणुका, दुकाने उघडणे, सेल, प्रदर्शने, दिवाळी, ख्रिसमस, ईद, नववर्ष तसेच सामाजिक कार्यक्रमां मध्ये सजावटीच्या दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.त्यावेळी घर, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे विद्यूत रोषणाईने प्रकाशमान होतात. मात्र दरवर्षी सणासुदीच्या काळात अनेक आगीच्या घटना घडतात आणि त्यापैकी बहुतांश घटना असुरक्षित विद्युत रोषणाईमुळे झालेल्या असतात.वीज आनंद वाढवते, पण ती केवळ सावधगिरीने आणि जबाबदारीने वापरलीतरच.
बहुतेक सणासुदीची विद्युत मांडणी ही तात्पुरती असते.तात्पुरत्या वायरिंग व्यवस्था कायमस्वरूपी वायरिंग पेक्षा अधिक धोकादायक असतात, कारण त्या अनेकदा घाईत, अप्रशिक्षित व्यक्तीं मार्फतआणि योग्य साहित्य किंवा तपासणी शिवाय केल्या जातात.सणांच्या काळातील आगीचेसर्वात सामान्य कारण म्हणजे जोडणी सैल (looseconnection).सजावटीचेदिवे अनेकदा योग्य प्लग टॉप किंवा कनेक्टर न वापरता उघड्या वायर वळवून जोडले जातात.अशा सैल जोडीतून विद्युत प्रवाह (current)वाहू लागला की ठिणगी(sparking)आणि असामान्य उष्णता निर्माण होते. ही ठिणगी पडदे, कापडी सजावट, कागदी कंदील, थर्माकोल किंवालाकडीफर्निचरयांसारख्या ज्वलनशील वस्तूंना लागली तर आग झपाट्यानेपसरूशकते.
आणखी एक गंभीर समस्या म्हणजे आयात केलेल्या सजावटीच्या दिव्यांचा वापर.अशा दिव्यांचे प्लग पिन्स भारतीय सॉकेट मानकांशी (ISImarking) जुळत नाहीत.त्यामुळे प्लग सॉकेटमध्येनीटबसत नाही, संपर्क तुटक-तुटक होतो आणि त्यातून ठिणगी व उष्णता वाढते. अनेक सजावटीच्या दिव्यां मध्येISI नसलेल्या, अतिशय पातळआणि निकृष्ट दर्जाच्या वायर (wires)वापरल्या जातात.सुरुवातीला त्या सुरक्षित वाटतात, पण अनेक ताससलग वापर केल्यावर वायर गरम होतात, इन्सुलेशन मऊ पडते आणि आतल्याकंडक्टरमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते. अनेकदा कोणतीही दृश्य लक्षणे(visiblesigns)दिसण्या आधीच आग लागते.
अनेक घरांमध्ये सणाच्या दिव्यांसाठी एकाच सॉकेटवरून एक्स्टेन्शन कॉर्ड किंवा मल्टी-प्लग वापरले जातात.त्यामुळे सॉकेट, आतील वायरिंग आणि एक्स्टेन्शनबोर्डवर विद्युत भारावर(onelectricload)जास्त ताण येतो. हा ओव्हरलोड तात्काळ MCB ट्रिप करेलचअसे नाही, त्यामुळे सॉकेट किंवा प्लग टॉपमध्ये उष्णता साचत जाते. अनेक वेळा ही सॉकेट्स फर्निचरच्या मागे किंवा पडद्यांच्या जवळ असतात, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. निकृष्ट दर्जाच्या एक्स्टेन्शन बोर्ड मधील आतल्या वायरिंग व संपर्क हे सलगजास्त भार सहन करण्यासाठी बनवलेले नसतात.
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी, सजावटीची रोषणाई कधीकधीथेट स्ट्रीट लाईट पोल किंवा फीडर पिलरवरून, परवानगी, भार गणना किंवा संरक्षण यांशिवाय जोडली जाते.तात्पुरत्या वायर रस्त्यावरून ओढल्या जातात, लोखंडी पोल, झाडे किंवा रेलिंगलाबांधल्या जातात. या वायर वारा, पाऊस आणि यांत्रिक नुकसान (mechanicaldamage)तसेच उघड्या असतात. फीडर पिलर किंवा स्ट्रीट लाईट पोलवर चुकीची टर्मिनेशन झाल्यास ठिणगी निर्माण होते, जी अनेकदा लक्षात येत नाही.काही वेळा संपूर्ण रस्ताकिंवा परिसर उजळवला जातो, पण फीडर पिलर ती अतिरिक्त भार सुरक्षितरी त्यापेलू शकतो की नाही, याची तपासणी केली जात नाही. परिणामी केबल गरम होणे, जोड(joint)निकामी होणे, आग लागणे किंवा पादचाऱ्यांना विद्युत धक्का बसण्याचा धोका निर्माण होतो.
ओलावा हा आणखी एक गंभीर धोका आहे. दव, आर्द्रता किंवा अचानक पावसामुळे सजावटीच्या दिव्यांमध्ये, जोडांमध्ये किंवा सॉकेटमध्ये ओलावा शिरतो.जोडणी सैल (looseconnection)किंवा खराब इन्सुलेशनसोबतओलावा मिळाला, तर शॉर्ट सर्किट आणि आर्किंग होते. योग्य संरक्षण नसलेल्या तात्पुरत्या मांडणीत अशादोषांमुळे आजूबाजूच्या वस्तूंनाक्षणात आग लागू शकते.
सुरक्षित सणासुदीची रोषणाई काही सोप्या उपायांनी शक्य आहे.चांगल्या दर्जाचे, योग्य इन्सुलेशन आणि मानक चिन्ह असलेले सजावटीचे दिवेच वापरावेत.दिवेनेहमी योग्य प्लग टॉपद्वारे मानक चिन्ह असलेले सॉकेटमध्ये घट्ट बसवावेत आणि थेट वायर घालणे टाळावे. प्रत्येक सॉकेट त्याच्या रेटिंगनुसारच वापरावे आणि जास्त एक्स्टेन्शन कॉर्ड किंवा मल्टीप्लग टाळावेत.शक्य असल्यास सणाची रोषणाई स्वतंत्र सर्किटवरून, योग्य MCBआणि RCCB संरक्षणा सहद्यावी.तसेच सार्वजनिक रोषणाईसाठी योग्य अर्थिंग (earthing)आणि प्लग सॉकेट बाह्य हवामानासाठी असलेले(outdoor) असावेत.
तात्पुरती वायरिंग मजबूतपणे आधारलेली, योग्यरी त्या इन्सुलेट केलेली आणि तीक्ष्ण कडा, हालणाऱ्या वस्तू व ज्वलनशील साहित्यापासून दूर ठेवावी. फीडर पिलर किंवा वितरण बिंदूंवरील जोडण्या केवळ पात्र व्यक्तींनी, योग्य पद्धतीने, लग्स(lugs)आणिग्लँड्सवापरूनकराव्यात.मांडणी पूर्ण झाल्यावर जोडणी, उष्णता, अर्थिंग किंवा ठिणगी(sparking)यांची प्राथमिक तपासणीकरावी.सर्वातमहत्त्वाचे म्हणजे, गरज नसताना- विशेषतःरात्रीउशिरा – सजावटीचेदिवे बंद ठेवावेत. सण हे आनंद पसरवण्यासाठी असतात, धोका निर्माण करण्यासाठी नाहीत.काहीता सांचा निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी करू शकते.
(लेखक वीजविषयकसल्लागारआहेत.)
ajitnkulkarni@yahoo.com
