सार्थक सेठ
मुंबईच्या विस्ताराचा भौगोलिक इतिहास पाहिला तर तो नेहमीच अत्यंत नैसर्गिकरीत्या तिथल्या पायाभूत सुविधांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जात राहिला आहे. मग ती पश्चिम उपनगरे असोत किंवा ठाण्याचे सुखसुविधांनी सुसज्ज घरांच्या नंदनवनात झालेले रूपांतर असो; प्रत्येक दशकामध्ये विकास मूळ मुंबई शहराच्या सीमा ओलांडून संधीच्या नवीन क्षेत्रांमध्ये विस्तारताना दिसून आला आहे. मुंबईचा विकास आता खाडी ओलांडून पूर्व दिशेला नवी मुंबईच्या दिशेने वेगाने होत आहे. मुंबई महानगर प्रदेशात राहण्यासाठी आणि व्यवसाय, उद्योगधंद्यांसाठी एक स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण ठिकाण अशी नवी मुंबईची ओळख अधिकाधिक मजबूत होत आहे. या मोठ्या परिवर्तनामध्ये, तुलनेने शांत असलेले एक ठिकाण म्हणजेच घणसोली… सध्याच्या काळातील सर्वात लक्षवेधी असे मायक्रो-मार्केट म्हणून वेगाने उदयास येत आहे.
ताज्या बाजार अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात जितकी नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली, त्यापैकी १७% घरे एकट्या नवी मुंबईतील होती. यावरून बांधकाम व्यावसायिकांचा वाढता आत्मविश्वास आणि गृहखरेदीदारांची मोठी मागणी स्पष्टपणे दिसून येते. गेल्या काही वर्षांत येथील बाजारपेठेचा झपाट्याने झालेला विकास पाहता, या परिसरातील जमिनीच्या आणि घरांच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे.
पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईच्या गुंतवणुकीला गती
नवी मुंबईच्या प्रगतीला चालना देणारा हा वेग प्रदीर्घ आणि मूलभूत बदलांवर अवलंबून आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे हे शहर आता प्रमुख व्यावसायिक केंद्रांशी वेगाने जोडले जात आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकने दक्षिण मुंबईचा प्रवास एका तासावरून थेट २५ मिनिटांवर आणून या क्रांतीची सुरुवात केली. त्यातच, १ मे रोजी सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक अधिक विस्तारली असून, मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद झाला आहे. तसेच, आगामी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे’ येथील दक्षिण आणि पूर्व भागातील परिसरांना खूप मोठे आर्थिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
जेव्हा बांधकामाचा दर्जा आणि विकासाचा वेग एकमेकांशी सुसंगत होऊ लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने रिअल इस्टेट बाजारपेठ परिपक्व होते; आणि घणसोली आता नेमक्या याच टप्प्यात प्रवेश करत आहे. यासोबतच, नवी मुंबईचा नैसर्गिक परिसरही तितकाच आकर्षक आहे. येथील विविध गृहप्रकल्प अशा प्रकारे साकारले जात आहेत, जेथून आजूबाजूच्या टेकड्यांचे विहंगम दृश्य आणि मोकळी हिरवळ ग्राहकांना मनसोक्त अनुभवता येईल. वाढते मेट्रो मार्ग, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि नावाजलेल्या (ग्रेड ए) बांधकाम व्यावसायिकांकडून उभारल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज, भव्य टाउनशिप्स यांमुळे नवी मुंबई आता एक स्वयंपूर्ण महानगर आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे मुख्य केंद्र बनत आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकडे ठाण्याला पर्याय म्हणून पाहिले जात नाही.
कॉर्पोरेट विकासाची यशोगाथा : जास्तीत जास्त व्यवसाय नवी मुंबईला पसंती का देत आहेत?
नवी मुंबईमध्ये होत असलेल्या व्यावसायिक रिअल इस्टेटच्या वाढीमागे तात्पुरती तेजी-मंदी हे एकमेव कारण नाही, या वाढीचा आधार अत्यंत मजबूत आणि रचनात्मक आहे. दक्षिण मुंबई, बीकेसी आणि लोअर परेल या भागांत मिळून सध्या एकूण पाच ते साडेपाच कोटी स्क्वेअर फूट इतक्या जागेची, उच्च दर्जाची (ग्रेड ए) कार्यालये उपलब्ध आहेत. यामुळेच ही ठिकाणे भारतातील सर्वांत जास्त भाडे असणारी बाजारपेठ बनली आहेत. परंतु या प्रत्येक ठिकाणी जागेची स्वतःची अशी एक मोठी मर्यादा आहे. जुन्या मुंबईत पुनर्विकासाच्या मर्यादा, हेरिटेज वास्तूंना लागू असलेले कडक नियम, चटईक्षेत्र निर्देशांकावरील निर्बंध आणि बीकेसीमध्ये नवीन इमारतींसाठी जागाच शिल्लक न राहणे, यामुळे जागतिक कंपन्यांना आपला विस्तार करणे कमालीचे कठीण झाले आहे. दुसरीकडे, नवी मुंबईत सध्या तब्बल २ कोटी ४० लाख स्क्वेअर फूट ग्रेड ए दर्जाच्या कार्यालयांची जागा उपलब्ध आहे, जी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या एकूण पुरवठ्यापैकी जवळपास २०% आहे. विशेष म्हणजे, येथील कार्यालयांचे भाडे मुंबईच्या सरासरी भाड्यापेक्षा तब्बल ५७% कमी आहे. त्यामुळे, हुशार कर्मचारी मिळवण्यासोबतच खर्चाची बचत करू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी या फायद्याकडे दुर्लक्ष करणे अजिबात शक्य नाही.
खर्च आणि जागेचा हाच मोठा फायदा आता अधिकाधिक कंपन्यांना स्वतःकडे आकर्षित करत आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा, इंजिनिअरिंग, शिपिंग आणि व्यावसायिक सेवा देणाऱ्या जागतिक कंपन्यांसाठी नवी मुंबई हे सध्या सर्वात पसंतीचे ठिकाण म्हणून समोर आले आहे. या अशा क्षेत्रांतील कंपन्या आहेत, ज्यांना मोठ्या प्रमाणावर जागा आणि कामात कोणताही अडथळा न येता सातत्य राखण्याची गरज असते. आज संपूर्ण नवी मुंबईतील ८७% कार्यालये आधीच बुक झाली असून, २०२८ पर्यंत आणखी ४० लाख स्क्वेअर फूट नवीन जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सध्याची मागणी आणि पुरवठा पाहता, सुरुवातीलाच इथे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना याचा प्रचंड फायदा होणार आहे.
घणसोली कॉरिडॉर : वाशी, ऐरोली आणि परिसर
घणसोलीचे महत्त्व नेमके कशात आहे हे जाणून घेण्यासाठी, सर्वात आधी नवी मुंबईच्या बाजारपेठेची भौगोलिक रचना समजून घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण परिसराच्या विकासाची यशोगाथा प्रामुख्याने ‘ठाणे-बेलापूर रोड’च्या आजूबाजूला विणलेली दिसते, जो उत्तर ते दक्षिण दिशेला जोडणारा या भागातील मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दक्षिण टोकाला वाशी हे शहर वसलेले आहे, जे नवी मुंबईतील सर्वात जुने, सर्वाधिक विकसित आणि सध्याच्या काळातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक आहे. तर दुसरीकडे, या रस्त्याच्या अगदी उत्तर टोकाला ऐरोली हे शहर आहे, जे रोजगाराच्या दृष्टीने सर्वात अग्रेसर मानले जाते. ऐरोलीमध्ये आयटी पार्क्स, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या भव्य कॅम्पसेसची खूप मोठी साखळी निर्माण झाली आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या शहरांच्या अगदी मध्यभागी, अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर घणसोली वसली आहे. त्यामुळे घणसोलीत राहणाऱ्यांना मोठ्या कंपन्या आणि नोकरीची ठिकाणे जवळ आहेत; सोबत उत्तम लोकल ट्रेन कनेक्टिव्हिटी आणि राहायला अगदी नवीन, आधुनिक घरे मिळतात.
गेल्या वर्षभरात नवी मुंबईतल्या प्रमुख भागांमधील घरांचे ट्रेंड्स पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की, या संपूर्ण परिसराची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. यामध्ये घणसोलीतील किमतींचा आलेख तर विशेष लक्षवेधी आहे, ज्याला इथे प्रत्यक्ष राहू इच्छिणारे लोक आणि गुंतवणूकदार या दोघांचीही मोठी साथ मिळत आहे. गेल्या ५ वर्षांचा विचार केला, तर इथल्या मालमत्तेच्या किमतींमध्ये तब्बल २२% पेक्षा जास्त मोठी वाढ झाली आहे. या वाढीला कारणीभूत ठरले आहेत ते म्हणजे इथले मोठे पायाभूत सोयी-सुविधांचे प्रकल्प, घरांची सतत राहणारी मजबूत मागणी आणि जुन्या व नव्या निवासी भागांचा झालेला विस्तार. यासोबतच, इथे भाड्याने राहणाऱ्यांची मागणीही तितकीच झपाट्याने वाढली आहे. यामुळेच, दीर्घकाळासाठी घर खरेदी करणारे आणि भाड्यातून चांगला परतावा शोधणारे गुंतवणूकदार या दोघांसाठीही घणसोली हा आज नवी मुंबईतला एक सर्वात फायदेशीर आणि परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे.
‘घणसोलीच्या सुवर्णकाळाकडे’ एक नजर
बहुतेक यशस्वी रिअल इस्टेट मार्केट्सचा प्रवास एका ठरलेल्या मार्गानेच पुढे जातो- सर्वात आधी तिथे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या येतात, त्यानंतर राहण्यासाठी घरांची मागणी वाढते, मग पायाभूत सोयी-सुविधांचा विस्तार होतो; आणि शेवटी, जेव्हा या परिसराबद्दलचा विश्वास एका विशिष्ट पातळीवर पोहोचतो, तेव्हा नामांकित बिल्डर्स तिथे येतात आणि पुढच्या विकासाला एका मोठ्या उंचीवर नेतात. घणसोली सध्या अगदी नेमकेपणाने याच चक्रामध्ये विस्ताराच्या टप्प्यात पोहोचली आहे.
मुंबई महानगर प्रदेशाचा प्रमुख विकास मार्ग म्हणून नवी मुंबई वेगाने उदयास येत आहे. या प्रगतीमध्ये घणसोली हे ठिकाण आपल्या महत्त्वाच्या भौगोलिक स्थानामुळे आणि सुधारत असलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे गुंतवणुकीचे मुख्य केंद्र बनले आहे. इथे मोठ्या आयटी कंपन्या आणि आधुनिक गृहप्रकल्प येत असल्यामुळे घरांच्या भाड्याची मागणी खूप वाढली आहे. परिणामी, भविष्यात येथील मालमत्तेच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊन दीर्घकालीन फायदा मिळणे निश्चित आहे. म्हणूनच, आता घणसोलीकडे केवळ एक नवीन विकसित होणारा भाग म्हणून न पाहता, येणाऱ्या १० वर्षांसाठी नवी मुंबईतील गुंतवणुकीचा तो सर्वात ‘स्मार्ट’ आणि सुरक्षित पर्याय मानला जात आहे.
(लेखक टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख आहेत.)
