अंतर्गत सजावट ही नसíगक, प्रफुल्लीत आणि जिवंतपणा निर्माण करणारी व्हावी यासाठी आमच्याकडून वापरलं जाणारं हुकमाचं पान म्हणजे निसर्ग! झाडं, पानं, फुलं यांनी सजवलेलं घर नेहमीच प्रसन्न, उबदार वाटतं. घराच्या हॉलला लागून सुरेख बाल्कनी असेल, किचनला बाल्कनी असेल किंवा टेरेस फ्लॅट असेल तर अशा ठिकाणी छान हिरवळ फुलवून, निसर्गाच्या चतन्यदायी प्रसन्नतेसाठी, नसíगक गारव्यासाठी आसुसलेल्या मानवी मनांना हिरव्या निसर्गाची शाल नक्कीच पांघरता येते. मात्र हे करताना काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं असतं.
घराला टेरेस किंवा हॉलला लागून ऐसपस बाल्कनी असेल तर इथल्या जागेचा प्रथम अंदाज घ्यावा. हा भाग व्यवस्थित वॉटरप्रूफिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलेही लिकेजेस पुढे त्रासदायक ठरतात. यासाठी सुरुवातीलाच खबरदारी घेतलेली चांगली असते. दुरुस्ती झाल्यानंतर कशा प्रकारचं गार्डिनग करायचं आहे, म्हणजे नुसत्याच झाडांच्या कुंडय़ा ठेवायच्या आहेत की पद्धतशीरपणे मातीतली हिरवळ फुलवायची आहे, हे ठरवावं. फक्त कुंडय़ा ठेवायच्या असतील तरीसुद्धा इथला पाण्याचा निचरा नीट आहे ना ते बघावं लागतं आणि मातीतली हिरवळ हवी असेल तर तज्ज्ञांकडून गार्डिनग तयार करून घ्यावं. इथेही पाण्याचा निचरा आणि वॉटरप्रूफिंग या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गच्चीला, बाल्कनीला योग्य दिशेने उतार असणं आवश्यक आहे. सुरेख रंगांची, सुवासाची फुलझाडं किंवा आपल्या पसंतीची झाडं लावून वातावरण छान चतन्यदायी, आनंदमयी करता येतं.
अशा रीतीने एका बाजूला झाडांची मांडणी करून उरलेल्या भागात झोपाळा, छोटंसं कॉफी टेबल, आरामदायी खुच्र्या अशी रचना करू शकता. सकाळचा प्रसन्न वेळ किंवा संध्याकाळची निवांत वेळ तिथे मजेत घालवता येईल. वातावरणनिर्मिती करण्यासाठी इथे हँिगग लॅम्प, फ्लोअर लॅम्प, लाइट्ची योजना करता येते. हस्तकलेच्या, शिल्पकलेच्या वस्तू ठेवून होम गार्डनही सुरेख सजवता येतं. तसंच बागेचा पुरेपूर फिल येण्यासाठी रॉक गार्डन किंवा वॉटर फाऊण्टन हे उत्कृष्ट पर्याय आहेत. झुळझुळ वाहणारं पाणी आणि झाडं, पानं, फुलांची सळसळ निश्चितच रमणीय भासते.
किचन गार्डिनग केलं तर तिथे कढीपत्ता, ओवा, मिरची, टोमॅटो, तुळस, गवती चहा अशी झाडं लावता येतील. घराला बाल्कनी नसेल तर खिडक्यांच्या ग्रीलवर कुंडय़ामधून झाडं ठेऊन अनेक जण आपली झाडांची हौस पूर्ण करतात. हे करत असताना नेहमी हलक्या वजनाच्या कुंडय़ा आणि झाडं निवडावीत. ग्रील किती वजन पेलू शकतं याचा अंदाज घ्यावा. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय की नाही ते पाहावं.
ही झाली घराच्या बाहेरची बाग. आता झाडांचा वापर करून आपण घराच्या आतील काही जागा कशा सुशोभित करू शकतो ते पाहू या. हॉलमध्ये सीटिंगच्या बाजूला एखादं झाडं ठेवलं तर तिथल्या वातावरणाला एकप्रकारचा नसíगक फिल मिळतो. किंवा हॉलमध्येच डायिनग किंवा बुकशेल्फ असेल तर तिथेही एखादं सुंदरसं झाडं ठेवता येईल. कमी ऊन व पाणी लागणारी, कमी उंचीच्या झाडांनी घरातली सजावट खूप सुरेख जमून येऊ शकते. पार्म ट्री, फर्न, मनी प्लॅन्ट वगरे झाडं सजावटीला सौंदर्य बहाल करतात.  
अशा रीतीने आपण हिरव्या रंगाची नसíगक पखरण करून अंतर्गत सजावट अधिक कल्पक, चतन्यदायी व प्रसन्नमयी करू शकतो.     
(इंटीरिअर डिझायनर)