संदीप धुरत

मागील दोन वर्षांपासून असलेला कसोटीचा करोनाकाळ आणि त्यानंतर उद्योग क्षेत्राला आलेली मरगळ यामधून दसरा सण यंदा आशादायक ठरणार यामध्ये शंका नाही. जनजीवन पूर्वपदावर येण्याचे आणि आर्थिक घडी पुन्हा सुव्यवस्थित होण्याचे ते चिन्ह असेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घट आणि जास्त विक्री न झालेल्या घरांच्या संख्येमुळे, खरेदीदारांसाठी ठरावीक कालावधीत नवीन प्रकल्प येण्याची वाट न पाहता, रेडी-टू-मूव्ह फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.

यंदा नवरात्री आणि दसरा उत्सव उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन प्रकल्प/ कार्यक्रम सुरू करण्यासाठी दसरा हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. साधारणपणे, फ्लॅट्सचे बुकिंग याच सुमारास सुरू होते आणि दिवाळीपर्यंत चालू राहते. अनेक घर खरेदीदारांनाही असा विश्वास आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घर अथवा एखादी अन्य वास्तू खरेदी केल्याने सुख, समाधान आणि समृद्धी येते.

दसऱ्याच्या दिवशी नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी विश्वासांद्वारे आधारलेली कारणे अशी आहेत:

*  दसरा (किंवा विजयादशमी) हा एक शुभ दिवस आहे.

*  या दिवशी नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणे किंवा मालमत्ता घेणे हे लाभदायक मानले जाते.

*  मालमत्ता खरेदी करून किंवा नवीन व्यवसाय सुरू करून नवीन गुंतवणूक करणे अनुकूल मानले जाते. कारण या दिवशी दीर्घकालीन खरेदी केल्यास संपत्ती आणि आनंद वाढण्याची अपेक्षा असते.

*  नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक सुरू करण्यासाठी हे पवित्र मानले जाते, कारण या समृद्ध दिवशी कार्यारंभ करणे शुभ मानले जाते.

विशेष म्हणजे, दसऱ्याच्या मुहूर्तावर विकासक गृह खरेदीवर चांगली सवलत आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देतात.

मागील दोन वर्षांपासून असलेला कसोटीचा करोनाकाळ आणि त्यानंतर उद्योग क्षेत्राला आलेली मरगळ यामधून दसरा सण यंदा आशादायक ठरणार यामध्ये शंका नाही. जनजीवन पूर्वपदावर येण्याचे आणि आर्थिक घडी पुन्हा सुव्यवस्थित होण्याचे ते चिन्ह असेल.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घट आणि जास्त विक्री न झालेल्या घरांच्या संख्येमुळे, खरेदीदारांसाठी ठरावीक कालावधीत नवीन प्रकल्प येण्याची वाट न पाहता, रेडी-टू-मूव्ह फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.  फएफअ ने वेळेवर वितरण, प्रकल्पाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर आश्वासन दिल्याप्रमाणे, या क्षेत्रामध्ये आधीच खूप सकारात्मकता दिसून येत आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रकल्पाच्या सध्याच्या टप्प्यापासून, विकासकाद्वारे घेतलेल्या किंवा प्रलंबित परवानग्या इत्यादी सार्वजनिक माहितीसाठी उपलब्ध असतात. याद्वारे जे ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात, त्यांना सुरक्षितता प्राप्त होते.

मालमत्ता विश्लेषकांनी भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात, विशेषत: मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मध्ये, मालमत्ता घेणे खूप फायदेशीर ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एमएमआर क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, बदलापूर, पालघर, भिवंडी, उल्हासनगर, पेण, नवी मुंबई, ठाणे, मीरा रोड-भाईंदर, खोपोली, कर्जत, माथेरान आणि अलिबाग हे भाग समाविष्ट आहेत.

एमएमआरला रिअल इस्टेट क्षेत्रात इतके महत्त्व का आहे त्याचा आढावा घेऊया.

CREDAI- MCHI आणि CRE मॅट्रिक्सच्या संयुक्त अहवालानुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान, एमएमआरमधील घरांची विक्री तीन पटीने वाढून १.३३ लाख कोटी झाली आहे. या कॅलेंडर वर्षांत ऑगस्टपर्यंत एमएमआरमधील घरांची विक्री १,७१,१६५ युनिट्स इतकी झाली आहे, ज्याचे मूल्य १,३३,०१५ कोटी आहे.

इतकेच नाही तर, २०२० च्या तिसऱ्या तिमाही ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान एकूण जमीन व्यवहारांमध्ये  टटफ चा सर्वात मोठा वाटा ६४% आहे.

तुलनेने कमी किमती, स्टॅम्प-डय़ुटी कपातीच्या स्वरूपातील सवलती आणि लक्षणीयरीत्या कमी व्याजदर ही प्रमुख कारणे होती ज्याने एमएमआर पट्टय़ातील अपार्टमेंट अपग्रेडच्या आकारास प्रोत्साहन दिले. गृहकर्जाचे व्याजदर आता १० वर्षांच्या नीचांकी पातळीवर असल्याने देशभरातील मालमत्ता संपादनात वाढ अपेक्षित आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एमएमआरने त्याच्या न विकलेल्या स्टॉकमध्ये वर्ष-दर-वर्षी ८% ची प्रभावी घट करून विक्रीमध्ये चांगली प्रगती दाखवली आहे.

अनेक सेलिब्रेटी, व्यावसायिक आणि असंख्य स्टार्ट-अप उद्योजक, ज्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत झपाटय़ाने वाढ केली आहे, त्यांनी एमएमआर क्षेत्रात या मालमत्ता खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली आहे.

याव्यतिरिक्त, रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) कायदा, जो २०१६ मध्ये अस्तित्वात आला, त्याचा बाजारातील व्यवहारांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. गुंतवणूकदारांना विश्वास आहे की प्रकल्प वेळेवर आणि वचन दिलेल्या गुणवत्तेसह वितरित केले जातील. फएफअ ने या क्षेत्रात केवळ व्यावसायिकता वाढवली नाही तर खरेदीदारांचा आत्मविश्वासही वाढवला आहे.

भारतीय रिअल इस्टेटमधील मालमत्ता बाजाराची इको सिस्टीम आता बरीच चांगली आहे, कारण अर्थव्यवस्था आता सुधारण्याचे संकेत दर्शवीत आहे- ज्यामुळे खरेदीदार नवीन घर खरेदीसाठी प्रवृत्त होतील. सध्या उपलब्ध असलेल्या मालमत्तांच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपर्स दर्जेदार प्रकल्प आणत आहेत ज्यामुळे ग्राहकांचे गृहस्वप्न नक्कीच पूर्ण होईल. या दरम्यान विकासकांनी उत्तम प्रकारे आपल्या प्रकल्पांचे मार्केटिंग करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच एखादी जाहिरात प्रसिद्ध करताना त्यामध्ये काही उणीव किंवा चूक नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण तसे असेल तर ग्राहक आकर्षित होण्यापेक्षा दूर जाण्याची शक्यता अधिक.

या सणासुदीच्या मोसमाला भारतात खूप महत्त्व आहे आणि हा काळ बाजारात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे योगदान देतो. घर खरेदी करणे हा एक भावनिक निर्णय आहे आणि लोक नवीन प्रारंभासाठी एखाद्या शुभ प्रसंगाची वाट पाहणे पसंत करतात. घरांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा गृह खरेदी आश्वासक आणि उत्तम राहील असे अंदाज आहेत. सणासुदीच्या काळात मालमत्तेच्या बाजारपेठेत एक उजळ बाजू दिसेल, कारण किमतीदेखील काही काळापासून स्थिर आहेत, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी चांगला कालावधी मिळतो. आजची बाजारपेठ खरेदीदारांसाठी खूप स्थिर आहे, पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे घरात गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ आहे.

sdhurat@gmail.com

(लेखक हे स्थावर मालमत्ता विशारद आहेत.)