एखाद्याला वाटते म्हणून विशिष्ट मार्ग चिन्हांकित करण्याची आवश्यकता असली तरी त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, सोसायट्यांच्या परिसरात किंवा सार्वजनिक मार्गांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या दिसून येतात.काही धार्मिक परंपरा आणि श्रद्धांशी या पट्ट्यांचा संबंध असल्याचे सांगितले जाते. तथापि, श्रद्धा आणि धार्मिक भावना यांचा आदर राखत असतानाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, सार्वजनिक रस्ते, पदपथकिंवा इतर सार्वजनिक जागांवर अशा प्रकारच्या खुणा करणे कायदेशीर आहे का? आणित्यामुळे इतर नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होत असेल तर त्याकडे कसे पाहिले पाहिजे?

रस्ते, पदपथ, सार्वजनिक उद्याने आणि सोसायटीच्या बाहेरील परिसर हे कोणत्याही एका व्यक्तीचे, समाजाचे किंवा धर्माचे नाहीत. हे सर्व नागरिकांच्या मालकीचे आहेत. महानगरपालिका किंवा सरकार त्यांचे विश्वस्त म्हणून काम करते. त्यामुळे या जागांवर कोणताही धार्मिक, सामाजिक किंवा जातीय समूह आपल्या मना प्रमाणे गोष्टी करू शकत नाही.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेलाआहे. मात्र हा अधिकार पूर्णपणे अमर्याद नाही.राज्यघटनेच्या कलम २५मध्येधर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला असला तरी तो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे.याचा अर्थ असा की कोणत्याहीधर्माच्यानावाखाली सार्वजनिक मालमत्तेचा वापर किंवा बदल मनमानी पद्धतीने करता येत नाही.

रस्ते, पदपथ, चौक आणि सार्वजनिक जागा या सर्व नागरिकांच्या समान वापरासाठी असतात. त्यावर कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा धार्मिक गटाचा विशेष अधिकार नसतो.एखाद्याला वाटते म्हणून विशिष्ट मार्ग चिन्हां कित करण्याची आवश्यकता असली तरीत्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. अन्यथा अशाप्रकारचीकृती सार्वजनिक मालमत्तेमध्ये अनधिकृत हस्तक्षेप मानली जाऊ शकते.

विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीती लरस्त्यांवर रंगकाम, खुणा किंवा चिन्हे करण्याचा अधिकार केवळ संबंधित प्रशासनाकडे असतो. वाहतूक नियंत्रण, रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थापन यासाठी रस्त्यां वरील चिन्हे निश्चित मानकांनुसार केली जातात. खाजगी व्यक्ती किंवा संस्थांनी स्वतःहून रंगाच्या पट्ट्या मारल्यास नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊशकतो.काही वेळा वाहतुकीच्यासुरक्षेवरहीत्याचा परिणाम होण्याचीशक्यताअसते.

यापेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक जागेचेहळूहळू धार्मिक स्वरूपात रूपांतर होण्याचा धोका.एखाद्याधर्माच्याश्रद्धेच्याआधारावर सार्वजनिक रस्त्यावर खुणा करण्यासमुभा दिली गेली, तर भविष्यात इतर धर्म किंवागटहीअशाचप्रकारच्यामागण्या करू शकतात.त्यामुळे सार्वजनिक जागा सर्वांसाठी समान आणि तटस्थ राहण्याचे मूलभूत तत्त्वधोक्यात येऊ शकते.

कायद्याच्यादृष्टीनेपाहिले तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनधिकृत बदल याबाबत विविध कायदे लागू होऊशकतात. महाराष्ट्र महानगरपालिका कायदे, नगरपालिका कायदे तसेच सार्वजनिक मालमत्तेच्यासंरक्षणासंबंधीच्या विविध तरतुदींनुसार स्थानिक प्रशासनालाअशा अनधिकृत खुणा काढूनटाकण्याचा अधिकार आहे. आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तींविरुद्धकारवाईहीकेलीजाऊशकते.

अर्थात, या विषयाकडेकेवळकायदेशीरनव्हे तर सामाजिक दृष्टीकोनातूनहीपाहणे आवश्यक आहे. या पट्ट्यांमागेचांगलाहेतू असला तरी सार्वजनिक मालमत्तेचा वापर कायद्याच्याचौकटीतच झाला पाहिजे. अन्यथा प्रत्येक गटआपापल्या श्रद्धा किंवापरंपरांनुसार सार्वजनिक जागा वापरूलागल्यास प्रशासन आणिनागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण होऊशकतात.

यासाठीप्रशासनाने स्पष्ट धोरणआखण्याची गरज आहे. सार्वजनिक रस्ते आणि जागांवरकोणत्याहीप्रकारच्या अनधिकृत धार्मिक किंवाखाजगी खुणा करण्यासपरवानगीनसल्याचेस्पष्टपणेजाहीर केले पाहिजे.तसेचआधीपासूनअस्तित्वातअसलेल्याअशाखुणांचीपाहणीकरून आवश्यक त्याठिकाणीत्याहटविण्याचीकारवाईकेलीपाहिजे.त्याचवेळी संबंधित धार्मिक संस्थांशी संवाद साधूनत्यांच्याश्रद्धांचासन्मानराखतकायदेशीर पर्याय शोधणेही आवश्यक आहे.

लोकशाही व्यवस्थेतप्रत्येकालाआपल्याधर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे; परंतु त्याचवेळी सार्वजनिक मालमत्ता ही कोणत्याही एका धर्माचीकिंवासमूहाचीनसून संपूर्ण समाजाचीअसते.त्यामुळे श्रद्धा आणि सार्वजनिक हित यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. सार्वजनिक रस्तेआणि जागा सर्व नागरिकांसाठी समान राहिल्यापाहिजेत.कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा खाजगी कारणासाठी त्यावर अनधिकृत खुणा करणे हे योग्य नाही.कायद्याचे राज्य टिकवूनठेवण्यासाठीआणि सार्वजनिक जागांचे तटस्थ स्वरूप जपण्यासाठीअशाप्रकारच्याकृतींवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे.

धर्म आणि तत्सम बाबी या सर्व चधर्माच्यालोकांनीउंबर्‍याच्याआतपाळाव्या. जर कोणालास्वतःच्या घरात, मंदिरात किंवा समाजमंदिरात नियम पाळायचेअसतील तर ते पूर्णपणे वैध आहे. परंतु रस्त्या वर किंवासोसायटीच्यासर्वांसाठीअसलेल्याआवारातअशीकृत्ये करणे म्हणजेआपलेविशेषत्वअधोरेखितकरून इतर धर्मांच्या, जातींच्याआणिसमुदायांच्यानागरिकांनादुय्यमलेखणेहोय.