स्वप्नातला किंवा परीकथेतला राजपुत्र येईल आणि आपल्याला घेऊन जाईल म्हणून वाट पाहणाऱ्या असंख्य प्रणयिनी हिंदी आणि मराठी चित्रपटगीतात दिसतात. अगदी जुन्या चित्रपटांपासून ते थेट आजपर्यंत. ‘बहु बेगम’ची नायिका जगाच्या अंतापर्यंत प्रियकराची वाट पाहायला तयार आहे. तिची इतकीच माफक अपेक्षा आहे की त्या वेळी तरी त्याने जरूर यावे.

‘‘हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक
खुदा करे कि कयामत हो और तू आये’’

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
salim javed marathi news
सलीम-जावेद यांची जोडी का दुभंगली?
Kranti Redkar twin daughters started crying After watching the movie Kakan
Video: “मम्मा, तू चुकीचा चित्रपट बनवला…” ‘काकण’ची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या मुली ढसाढसा लागल्या रडू, म्हणाल्या…
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

इंदिरा संतांच्या कवितेतली मराठमोळी नायिका म्हणते,

‘‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले
िभती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच, नाही मिटायाची बोली.”

दाराची काय बात, काही वेळा बिचाऱ्या नायिकेचे डोळेदेखील मिटायला तयार नसतात. ‘पाकिजा’मधली नायिका प्रियकराला आळवताना म्हणते,

‘‘सूरज कहीं भी जाये, तुमपर न धूप आये
तुमको पुकारते हैं इन गेसुओं के साये
आ जाओ मं बना दूं पलकों का शामियाना
मौसम है आशिकाना,
ए दिल कहींसे उनको ऐसे में ढूंढ लाना..’’

फराज यांची नायिका अतिशय हळवी आहे. तिचा प्रियकर तिला दुखावून गेला आहे. तरी त्याला ती आर्त साद घालताना म्हणते,

‘‘रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ
आ, फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ..
माना कि मुहब्बत का छिपाना है मुहब्बत
चुपकेसे किसी रोज जताने के लिये आ..’’

‘मुंबईचा जावई’ची गदिमांच्या गीतातील नायिका मात्र इतका तरल विचार करायला किंवा थांबायला तयार नाही. स्वप्नातला प्रियकर यावा त्याची-तिची ओळख व्हावी नि लगेच त्याच्याबरोबर पळून जावे असा तिचा धाडसी बेत आहे.

‘‘आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे.’’

आणि दादा कोंडके यांच्या गीतातील नायिकेचा (तुमचं आमचं जमलं) ‘साज शिणगार’ अधिक रांगडा असला तर त्यात काय नवल!  

‘‘झाल्या तिन्ही सांजा करून ‘शिणगार साजा’
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा
प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळय़ात घालीन हार
दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा’’

‘ते माझे घर’मधली रवींद्र भटांची नायिका मात्र लाजरीबुजरी आहे. पण तिच्या प्रतीक्षेची उत्कटता तिळमात्र कमी नाही..

‘‘तुझिया स्वागत उभी समोरी, पाहुनी हसणार तू-
येणार तू, येणार तू
अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते उगा तयातून येणार तू
येणार तू, येणार तू..’’

साध्यासुध्या प्रणयिनींची ही साधीसुधी गाणी आठवल्यावर कवी अनिलांचे गूढतेकडे झुकणारे गीत आपल्याला वेगळय़ा वातावरणात कसे नेते, पाहा.

‘‘उघड दार, उघड दार,
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रीच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरुनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले
उघड दार, उघड दार,
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार..’’

एखाद्या कमनशिबी देवदासला पारोचे घर नेमके ठाऊक असते. पण पारो आता दुरावलेली असते, त्याची राहिलेली नसते. तिच्यावर कोणताच अधिकार नसतो. पण कुठल्या तरी अबोध क्षणी दिलेले वचन पुरे करायचे म्हणून मरताना तिच्या दारात शेवटचा श्वास घेण्यासाठी तो तळमळतो आणि जिद्दीने तिच्या घरापर्यंत पोचल्यावर प्राण सोडतो आणि त्याच्या मरणाची बातमी ऐकून आता परक्याची झालेली पारो एका क्षणापुरती आपले गृहिणीपण त्यजते आणि धावत जाऊन त्याचे अंत्यदर्शन घेते.  
विरहाची, मिलनातील अडथळय़ांची दु:खद जाणीव फराज यांच्या नायकालादेखील आहे. त्यामुळे तिच्यासह चार पावले तरी आयुष्याची वाटचाल करावी असे तो स्वप्न बघतो.

जुदाईयां तो मुकद्दर है फिर भी जान-ए-सफर
कुछ और दूर जरा साथ चलकर देखते हैं

आणि खूप दिवसांत तिची काही खबर कानी पडली नाही, ती भेटली नाही म्हणून व्याकूळ होताना तो तिच्या घराकडे निघतो..

बहुत दिनों से नहीं है कुछ उसकी खैर खबर
चलो ‘फराज’ कूए-यार चलके देखते हैं

मात्र ज्यांना आपली वाट बघणाऱ्या दाराचा पत्ता ठाऊक नसेल त्यांचं दुख किती तीव्र असेल. इथं वाट बघणारं दार म्हणजे अगदी प्रेयसीच असायला हवी असं काही नाही. जिच्याशी सूर जुळतील, संवादांच्या तारा जुळतील, नजरेच्या पहिल्या कटाक्षात नात्याची ओळख पटेल असं ‘कोणीतरी आपलं माणूस’ जगात असावं हे प्रत्येकच संवेदनशील व्यक्तीला वाटत असतं. मोठय़ा अपेक्षेनं जाऊन त्या दारावर थाप दिली आणि आतून प्रतिसाद आला नाहीतर?  
कॉलेजात असताना आम्हाला पाठय़पुस्तकात वॉल्टर द ला मेअर या कवीची ‘द लिसनर्स’ ही कविता होती. पण अभ्यासाच्या धबडग्यात ती यंत्रवत शिकवली गेली. तितक्याच यंत्रवत आम्ही ती वाचली नि विसरून गेलो. पुढे अनेक वर्षांनी रमेश मंत्री
यांच्या ‘महानगर’ कादंबरीमध्ये या कवितेचा उल्लेख आढळला. एका शांत उत्तररात्री आना आणि श्रीकांत पायी फिरत असताना आना अगदीच सोप्या शब्दांत श्रीकांतला या झपाटणाऱ्या कवितेबद्दल सांगते, ते वाचताना या कवितेचा गूढ अर्थ काळजात विजेसारखा लखलखला.  

चांदण्या रात्री एक प्रवासी घोडय़ावरून येतो नि घराच्या बंद दारावर टकटक करून विचारतो,    

“Is there anybody there?” said the Traveller,
Knocking on the moonlight door.

पण त्याच्या हाकेला कोणी प्रतिसाद देत नाही. त्याच्या व्याकूळ चॉकलेटी नजरेकडे ढुंकून पाहात नाही.

But no one descended to the Traveller     
No head from the leaf-fringed sill
Leaned over and looked into his grey eyes      

गूढ चांदणी रात्र, गोंधळलेला प्रवासी, त्याच्या मानवी भावविश्वातील हाका ऐकणारे एकाकी घरातले अज्ञात श्रोते, त्याच्या हाकांचे रिकाम्या दालनात घोंगावणारे पडसाद, हवेत उठणाऱ्या अस्वस्थतेच्या भंगुर लाटा.. प्रवाशाला या साऱ्यातले विचित्रपण प्रतीत झाले.

“Tell them, I came, and no one answered,
That I kept my word,” he said.

 ‘‘त्यांना सांगा, मी आलो होतो, मला कोणी प्रतिसाद दिला नाही, मी माझे वचन पाळले.’’ प्रवासी त्या घराला सांगतो आणि मागे फिरतो. त्याच्या मागे वळण्याचे आवाज, घोडय़ाच्या टापांचे दूरवर जाणारे आवाज. श्रोते मूक राहतात. आपल्या मृदू पावलांनी नीरवता परतून येते. घर पूर्ववत होते. प्रवाशाचे पुढे काय होते. त्याला त्याचे वाट बघणारे घर सापडते का? हे सगळे कवीने आपल्याला व्याकूळ ठेवण्यासाठी सोडलेले अनुत्तरित प्रश्न.

And how the silence surged softly backward,
When the plunging hoofs were gone.

गंतव्यस्थान- आपले घर, आपले माणूस न सापडणे, सापडले तरी असे ते परके होऊन जाणे ही हळव्या कविमनाला चिरंतन घायाळ ठेवणारी अनुभूती. ‘द लिसनर्स’ ही कविता वाचकाला अशी अनुभवांच्या वेगळय़ा गत्रेत घेऊन जाते.