‘वास्तुरंग’ मधील (१४ मार्च) डॉ. शरद काळे यांचा ‘थेंबे थेंबे..’ हा लेख वाचला. पाण्याचा मुद्द्या लेखकाने खूप छान पद्धतीने मांडला आहे. प्रत्येकानेच नैसर्गिक स्रोतांबाबत जागरूक राहायला हवं. परंतु अनेकदा लोक याविषयी ऐकतात आणि सोडून देतात. त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.

पाणी बचतीचा मंत्र
‘वास्तुरंग’ मधील (१४ मार्च) डॉ. शरद काळे यांच्या ‘थेंबे थेंबे..’ या लेखामुळे पाणीबचतीचे वास्तव लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचले. हा लेख वाचल्यावर आपण किती प्रमाणात पाणी वाया घालवितो, हे लक्षात आले. या लेखामुळे पाणीबचतीचा मंत्र वाचक जपतील, अशी आशा आहे.
– सीमा करमरकर