अमितेश शाह
रिअल इस्टेटच्या क्षेत्रात प्रत्येकवेळी एक प्रश्न समोर येतो की, घर खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की, किमती कमी होण्याची किंवा सणासुदीच्या काळात मिळणार्या सवलतींची वाट पाहणे अधिक हिताचे ठरेल? व्याजदर, बाजारातील चढ-उतार, आर्थिक अनिश्चितता, निवडणुका किंवा जागतिक घडामोडींशी संबंधित चिंतांमधून अनेकदा हा प्रश्न समोर येतो. गुंतवणुकीसाठी किंवा खरेदीसाठी यापेक्षा अधिक चांगली संधी लवकरच मिळेल, या आशेने अनेकजण त्या ‘योग्य क्षणा’ची वाट पाहत राहतात. मात्र, माझ्या अनुभवानुसार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ ही क्वचितच कॅलेंडरच्या आधारे ठरवली जाते. ती बाजारपेठेची मूलभूत स्थिती, प्रॉपर्टी ज्या ठिकाणी आहे, त्या भागाची क्षमता, वैयक्तिक क्षमता आणि दीर्घकालीन विश्वास या घटकांच्या एकत्रित परिणामांवर अवलंबून असते.
स्थावर मालमत्ता ही अल्पकालीन मालमत्ता नाही. काही मिनिटांत खरेदी-विक्री करता येणार्या शेअर्सच्या अगदी विरुद्ध, पायाभूत सुविधांमुळे होणारी वाढ, भांडवली मूल्यवृद्धी, भाड्याचे उत्पन्न आणि मालकीच्या घराची उपयुक्तता याद्वारे मालमत्तेचे मूल्य जसजशी वर्षे जातात तशी वाढत जाते. परिणामी, योग्य वेळेची वाट पाहणे म्हणजे अनेकदा दीर्घकालीन मूल्यनिर्मितीच्या फायद्यांना मुकणे होय. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ही बाब लागू होते, जिथे विस्तारणार्या पायाभूत सुविधा, बदलती जीवनशैली आणि नवीन विकास कॉरिडॉरचा आखणी निवासी मागणी सातत्याने वाढवतो आहे.
मार्केटकडे लक्ष द्या : बाजारातील किमती नेमक्या कधी सर्वात कमी पातळीवर येतील याचा अंदाज लावण्याऐवजी, घर खरेदीदारांनी बाजाराच्या दीर्घकालीन सक्षम संकेत समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. अत्यंत सक्षम स्थितीत असताना मुंबई महानगर क्षेत्र ( टटफ) या टप्प्यात प्रवेश करत आहे. २०२६च्या दुसर्या तिमाहीत, या क्षेत्रात ३४,५५५ घरे बाजारात खरेदीसाठी खुली करण्यात आली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २३% वाढ दर्शवते; यापैकी नवीन निवासी प्रकल्प आणि एकूण गृहविक्रीमध्ये केवळ मुंबई शहराचा वाटा अनुक्रमे ६५% आणि ७०% पेक्षा अधिक होता. ही आकडेवारी प्रस्थापित विकासकांकडून होणारा नवीन पुरवठा आणि त्यासोबतच बाजारातील मागणीला असलेला चांगला प्रतिसाद दर्शवते.
उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी दर्जेदार प्रकल्पांना सातत्याने अधिक किंमत मिळत आहे, अशा ठिकाणी किमती कमी होण्याची वाट पाहणे शहाणपणाचे ठरू शकत नाही. आपल्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा-आधारित परिवर्तनांपैकी एकामधून सध्या एमएमआर ( टटफ) जात आहे. अटल सेतू (एमटीएचएल), नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोस्टल रोड्स, मेट्रो नेटवर्कचा विस्तार आणि नवीन कॉरिडॉर्स यांसारखे प्रकल्प लोकांचे जीवनमान, कामाचे स्वरूप आणि प्रवास करण्याच्या पद्धतीत सातत्याने सुधारणा करत आहेत. अखंड कनेक्टिव्हिटीमुळे, निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ जागांसाठी नवनवीन ठिकाणे समोर येत आहेत, ज्यामुळे शहराच्या पारंपरिक व्याख्येपलीकडे जात अनेक नवीन ठिकाणांना चांगले मूल्य निर्माण होते आहे. यामुळे ‘किमती कधी कमी होतील’ यापेक्षा ‘भविष्यात कोणत्या ठिकाणाला जास्त वाव मिळण्याची शक्यता आहे’ याचा अधिक विचार करणे गरजेचे होते.
व्यापक दृष्टिकोन महत्त्वाचा : गेल्या दशकात लोकांच्या घरांचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. घराचे मूल्यांकन आता केवळ त्याच्या आकारावर किंवा किमतीवर केले जात नाही. कनेक्टिव्हिटी, सोय, बांधकामाचा दर्जा, सुविधा, टिकाऊपणा, सामुदायिक पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन राहण्यायोग्यता हे सर्व या मूल्यांकनाचा भाग बनले आहेत.
एमएमआरमध्ये, जिथे प्रवासाच्या सोयी आणि आसपासच्या परिसराची पसंती झपाट्याने बदलते आहे, तिथे सर्वात कमी किमतीचा पर्याय शोधण्यापेक्षा सूक्ष्म-बाजारपेठांमध्ये योग्य घर शोधणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. खारघर, पनवेल, ठाणे यासारख्या ठिकाणांना महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण ग्राहक कनेक्टिव्हिटी, सामाजिक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या क्षमतेने समर्थित संतुलित जीवनशैलीला अधिकाधिक महत्त्व देत आहेत.
अनेक घर ग्राहकांसाठी, एखादी मालमत्ता मिळवणे एवढाच उद्देश नसतो; तर एखाद्या परिसराच्या दीर्घकालीन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन उत्तम जीवनशैली सुनिश्चित करणे हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. म्हणूनच, केवळ किमतीमधील थोड्याशा चढ-उतारावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, त्या परिसराचे भविष्यातील महत्त्व आणि उपयुक्तता यांचे मूल्यमापन करणे अधिक अर्थपूर्ण ठरते.
आर्थिक तयारी आणि उद्देश निर्णयाला दिशा देतात. गुंतवणूक करण्याची योग्य वेळ ही खरं तर ग्राहकाच्या आर्थिक स्थितीवर आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर अवलंबून असते. सात ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी स्वत:साठी घर खरेदी करणारी व्यक्ती, अल्प-मुदतीचा परतावा शोधणार्या व्यक्तीपेक्षा या निर्णयाकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहू शकते. घराचा दीर्घकालीन विचार करणार्या ग्राहकासाठी, किमतींमधील किरकोळ बदलाची वाट पाहण्यात संधी गमावण्याचा धोका असतो, विशेषत: जर मिळणारी प्रॉपर्टी आधीच कुटुंबाच्या गरजा आणि आर्थिक क्षमतेनुसार असेल. सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की, मागणीच्या आधारावर ती मालमत्ता कालांतराने तिचे मूल्य आणि प्रासंगिकता टिकवून ठेवू शकते का. आपण मार्केटमधील अत्यंत कमी किमतीत खरेदी केली आहे की नाही, ही खरी कसोटी नाही, तर ती गुंतवणूक अनेक बाजारचक्रांमधून मूल्य निर्माण करत राहू शकते का, ही खरी कसोटी आहे.
मग, योग्य वेळ कोणती?
खरं तर, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अशी कोणतीही एकच ‘योग्य वेळ’ नसते. त्याऐवजी, बाजारातील भक्कम मागणी, आर्थिक स्थिरता, ग्राहकांची बदलती पसंती, नामांकित विकासकांकडून मिळणारा दर्जेदार पुरवठा, पायाभूत सुविधांमुळे होणारा विकास आणि स्वत:ची आर्थिक सज्जता या गोष्टी एकत्रित असणे, हे गुंतवणुकीसाठी अधिक महत्त्वाचे संकेत मानले जातात. म्हणूनच, बाजारातील किमती कधी सर्वात कमी असतील याचा अचूक अंदाज लावण्यापेक्षा, बाजाराची दिशा समजून घेणे अधिक फायदेशीर ठरते. आज टटफ (मुंबई महानगर क्षेत्र) मध्ये घर घेण्याचा विचार करणार्यांसाठी, तिथली सातत्यपूर्ण मागणी, पायाभूत सुविधांचे विस्तारणारे जाळे आणि विकसित होणारे निवासी पट्टे ही दीर्घकालीन मूल्यनिर्मितीसाठी एक उत्तम पार्श्वभूमी ठरतात.
रिअल इस्टेटमध्ये, खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ ही आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा नसून, या प्रकल्पात योग्य ठिकाण, गुणवत्ता आणि दीर्घकालीन क्षमता यांचा योग्य मेळ साधतो का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो. कारण रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची योग्य वेळ ही कॅलेंडरवरील एखादी विशिष्ट तारीख नसते, तर ती अशी वेळ असते जेव्हा संधी, योग्य ठिकाण आणि तुमची आर्थिक तयारी एकत्र येतात.
(लेखक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, मुंबई विभाग आणि एमएमआर ( टटफ)चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
