देणे निसर्गाचे : पाणी : बचत, संवर्धन

रेन वॉटर हार्वेस्टिंग करून वाया जाणाऱ्या अक्षरश: लाखो लिटर्स पाण्याची आपण बचत करू शकतो. हेच पाणी नंतर पाणीटंचाईच्या काळात, उन्हाळ्यात वगरे आपणास उपयोगी पडू ठरू शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे वाचवलेले पाणी, पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी- जसे घरामध्ये इतर वापरासाठी, बागेसाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी उपयोगी पडते.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करून वाया जाणाऱ्या अक्षरश: लाखो लिटर्स पाण्याची आपण बचत करू शकतो. हेच पाणी नंतर पाणीटंचाईच्या काळात, उन्हाळ्यात वगरे आपणास उपयोगी पडू ठरू शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे वाचवलेले पाणी, पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी- जसे घरामध्ये इतर वापरासाठी, बागेसाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी उपयोगी पडते.
पा णी म्हणजेच जीवन याबद्दल दुमत नसावे! ‘पानी पानी रे’ किंवा ‘ पानी रे पानी तेरा रंग कैसा..’ अशा गाण्यांच्या ओळी गुणगुणताना आपला मूड अगदी छान असतो! पण हेच पाणी मिळणे जेव्हा दुर्लभ होते; तेव्हा वरील गाण्याचा अर्थ अगदी वेगळाच होऊन जातो व पाणी वेगळ्या अर्थाने आपला ‘रंग’ दाखवू लागते!
वाढती लोकसंख्या, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, त्याहून झपाटय़ाने नष्ट होणारी जंगले, वने, शेती, मोठमोठाल्या कारखान्यांच्या प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व त्यामुळे बदलणारे निसर्गचक्र या सर्वाचाच परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतोय असे दिसते.
अर्थात, आíथक व सामाजिक प्रगती करताना त्याची काही प्रमाणात किंमतही चुकवावी लागतेच! त्यामुळे ही प्रगती साधताना, आपणा सर्वाकडून पर्यावरण रक्षण व विशेषत: जलसंवर्धन कसे साधता येईल याचा विचार व्हायला हवा, कृती व्हायला हवी.
पाणी काही आपण तयार करू शकत नाही, पण उपलब्ध असलेले पाणी काळजीपूर्वक वापरणे, वापरलेल्या पाण्याचा शक्य तितका पुनर्वापर करणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर करणे, या व अन्य मार्गानी पाणी बचत व संवर्धन करता येणे शक्य आहे.
आपण सर्वानी आपल्या मनाशी शांतपणे विचार केला तर आपल्यालाच आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बचतीचे अनेक मार्ग सापडतील. इथे या लेखामध्ये आपण विचार करू. मुख्यत्वे शहरी व निमशहरी भागात जलसंवर्धन कसे करता येईल याचा. वाचकहो, जलसंवर्धनाचा सर्वात सोपा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे पावसाचे पाणी साठवणे/जिरवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेिस्टग करणे, हा होय. पाऊस पडताना तो इमारतींच्या/घरांच्या छतांवर पडून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहून जाते. पुढे ते पाणी कोठेतरी नाल्याला वगरे जाऊन मिळते. हेच छतावर पडणारे पाणी, शास्त्रीय पद्धतीने पन्हाळी, पाइप इ.च्या साहाय्याने गोळा करता येते. हे छतावरून गोळा केलेले पाणी  योग्य त्या फिल्टरच्या साहाय्याने गाळून ते जमिनीखाली अथवा जमिनीवर बांधलेल्या टाक्यांमध्ये साठवता येते. तसेच, ज्या ठिकाणी कूपनलिका अथवा विहिरी आहेत, अशा ठिकाणी हे पाणी पाइपच्या साहाय्याने सोडून त्याची साठवणूक करता येते (१ीूँं१ॠ्रल्लॠ). या सर्व प्रक्रियेला साधारणपणे ‘रेन वॉटर हार्वेिस्टग ’ (फहऌ) असे म्हणतात.
रेन वॉटर हार्वेिस्टग करून वाया जाणाऱ्या अक्षरश: लाखो लिटर्स पाण्याची आपण बचत करू शकतो. हेच पाणी नंतर पाणीटंचाईच्या काळात, उन्हाळ्यात वगरे आपणास उपयोगी पडू ठरू शकते. रेन वॉटर हार्वेिस्टगद्वारे वाचवलेले पाणी, पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी- जसे घरामध्ये इतर वापरासाठी, बागेसाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी उपयोगी पडते.  
महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वीच महानगरपालिकांमध्ये ठराविक बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेिस्टग हे जरुरीचे/सक्तीचे केले आहे. पण खरे तर या गोष्टीचा इतका उपयोग होतो की सगळीकडेच याचा वापर केला गेला पाहिजे.
अर्थात, फहऌ करताना त्यातील माहीतगारांची, तज्ज्ञांची मदत/मार्गदर्शन घेतले पाहिजे. याचे कारण सर्वच ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे सारखे नसते. तसेच सर्व ठिकाणची भौगोलिक परिस्थिती/ जमिनीची रचनाही वेगवेगळी असते. त्यामुळे पुण्यामधील  फहऌ हे मुंबईपेक्षा वेगळे असलेच पाहिजे. मुंबई महापालिकेच्या रेन वॉटर हार्वेिस्टग विभागाच्या मुख्य- सुप्रभा मराठे यांच्या मताप्रमाणे, मुंबईमध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे व अतिप्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे, रेन वॉटर हार्वेिस्टग करताना गोळा केलेले सर्वच पाणी कूपनलिकेमध्ये सोडणे शक्य नसते. त्यामुळे ते पाणी जमिनीवर अथवा जमिनीखाली टाकी बांधून त्यामध्ये सोडणे जास्त सोयीस्कर ठरते. ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता, गिरीश मेहंदळे  यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ठाणे महापालिकेच्या हद्दीत होणाऱ्या सर्व नवीन बांधकामांना  फहऌ केले आहे की  नाही हे निश्चितपणे तपासले जाते.
आपणांस  फहऌ बद्दल अधिक माहिती हवी असल्यास वरील महापालिकांच्या संबंधित खात्यांमध्ये ती मिळू शकते. दूरध्वनी क्रमांक: मुंबई महापालिका- ०२२ २२६९१००१/२२६२०२५१ व ठाणे महापालिका-०२२ २५३६३५८०. अर्थात, फक्त मुंबई, ठाणे व पुणे येथेच नाही, तर महाराष्ट्राच्या सर्वच भागांत रेन वॉटर हार्वेिस्टग करणे हे अत्यंत गरजेचे आहे व ते शक्यही आहे!
रेन वॉटर हार्वेिस्टगचे सोपे व साधे तंत्रज्ञान वापरून राजस्थान तसेच गुजरातमधील कित्येक दुष्काळप्रवण गावे ही आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. पाणी बचतीसाठी रेन वॉटर हार्वेिस्टगच्या व्यतिरिक्त वापर झाल्यावर सोडून/टाकून दिलेले पाणी जसे सांडपाणी, स्युवेज इ.वर प्रक्रिया करून त्यामधील जवळजवळ ८० ते ९० टक्के पाण्याचा पुनर्वापर करता येतो. याकरिता लागणारी साधनसामग्री अथवा प्लांट हा पाण्याची गुणवत्ता व त्याचे प्रमाण यावर आधारित असतो.
जाता जाता एक उदाहरण- चिंचवड येथील एका शाळेत वर्गाबाहेर रिकामे ड्रम ठेवलेले असतात. प्रत्येक विद्यार्थी शाळा संपल्यावर घरी जाताना आपल्या वॉटर बॅगमधील उरलेले पाणी त्या ड्रममध्ये टाकतो. हे पाणी नंतर शाळेच्या आवारातील झाडांना, बागेला टाकण्यात येते. किती साधी पण महत्त्वपूर्ण गोष्ट! यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पाणी बचतीचे व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजू लागते!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Save and store water do rainwater harvesting

ताज्या बातम्या