स्मार्ट बोर्ड (वीटविरहित बांधकाम उत्पादन) हे सेल्युलोज धागे, पोर्टल्यांड सीमेंट, सिलिका आणि अन्य भरीच्या मिश्रणापासून अत्याधुनिक पद्धतीने बनविलेले फायबर सीमेंट शिट्स आहेत. स्मार्ट बोर्डचा वापर उत्तम दर्जाच्या कोरडय़ा िभती, छत, पोटमाळे यांसाठी उपयुक्त ठरतो. स्मार्ट बोर्ड पाणी, वाळवी, आग आणि ध्वनी-प्रतिबंधक असल्याने त्याचा वापर घरात किंवा बाहेरही करता येतो. हे स्मार्ट बोर्ड फर्म आणि फ्लेक्स तंत्रज्ञानामुळे तयार केल्याने ते मजबूत आणि टिकाऊ आहेत.
 स्मार्ट बोर्ड हे प्लाय बोर्ड आणि जिप्सम बोर्ड यांना सर्वात मोठा पर्याय ठरू शकतात. बांधकामाचा एक भाग म्हणून स्मार्ट बोर्डची िभत (स्मार्ट वॉल्स) हे विटा आणि कॉंक्रिट वॉल यांना उत्तम पर्याय ठरू शकेल.
स्मार्ट बोर्ड लवचिक आहेत, परंतु ते तकलादू नाहीत. ते पाणी-वाऱ्याचा मारा सहन करू शकतात. स्मार्टबोर्डमध्ये जास्तीत जास्त भार सहन करण्याची ताकद असते. यामुळे तुम्ही त्यावर फ्रेमच्या सपोर्टशिवाय कोणत्याही जड वस्तू म्हणजे उदाहरणार्थ पेंटिंग्ज किंवा टी. व्ही. स्क्रीन्स वगरे सहजपणे लावू शकता. त्या कोणत्याही एका ठिकाणी ८० ते ९० किलोचा भार पेलू शकतात. स्मार्ट बोर्डच्या पृष्ठभागावर जड लॅमीनेट्स, पेंटिंग्ज, लाकडी पॉलिश, वॉल पेपर, सिरॅमिक टाईल्स, हलके दगड लावू शकता.
 स्मार्ट बोर्डचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्याने पीओपी न चढविता त्यावर रंग लावता येतो. स्मार्ट बोर्डची िभत गुळगुळीत आणि सुंदर असते. स्मार्ट बोर्डला प्लाय बोर्डाप्रमाणे साध्या लाकूड कापण्याच्या अवजारांनी कापता येते. स्मार्ट बोर्डला प्लाय बोर्डाप्रमाणे खिळे ठोकणे आणि स्क्रू लावणे सहज शक्य असते. यामुळे त्याचा उपयोग प्लाय बोर्डाप्रमाणे करता येतो. स्मार्ट बोर्डची भिंत वजनाने कमी असते. स्मार्ट बोर्डच्या िभतीं जाडीला कमी असल्याने तुमच्या जागेत अधिक काप्रेट / विक्रीयोग्य एरिया उपलब्ध होते. तसेच सर्व इलेक्ट्रिकल आणि प्लंिबगच्या दुरुस्त्या सहजपणे करता येतात. विशेष म्हणजे  स्मार्ट बोर्ड हे पर्यावरण अनुकूल आहे.