काय असतं हे घर.. होम, स्वीट होम असा या घराच्या संदर्भात उल्लेख केला जातो. जिथं गेल्यानंतर आपल्या सर्व चित्तवृत्ती प्रसन्न होतात, त्वरित बरं वाटतं, हलकं वाटतं.. असं सगळं काही वाटू देण्याचं सामथ्र्य या घरात असतं. बरं, हे घर तुम्हाला कधीही प्रवेश द्यायला मोकळं असतं. तुमच्यासाठी त्या घरावर ‘नो अ‍ॅडमिशन’ अशी पाटी कधीच नसते. दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी जा.. हे घर तुम्हाला प्रसन्नवदने ‘वेलकम’ म्हणून स्वागताला तयार (च) असतं.

मानवाच्या आयुष्यात निवासाच्या गरजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न-वस्त्रांच्या गरजा काही वेळेला चुटकीसरशी भागू शकतात; परंतु निवाऱ्याचं मात्र तसं नाही. डोईवर छप्पर असावं म्हणून सर्व आयुष्यभर आटापिटा केल्यानंतर स्वप्नवत असणारं हे घर हातात येऊ शकतं. तथापि या हटातटाच्या संघर्षांत माणसाने बरंच काही गमावलेलं असण्याची शक्यता असतं. हौसेमौजेला मुरड घालून, आवडीनिवडींवर र्निबध घालून, घर घेण्यासाठी काडी काडी जमवून शेवटी कुठे घराच्या चाव्या हातात पडतात. कुणाला हे घर चटकन लाभतं तर कुणाला आयुष्याच्या अगदी उत्तरार्धात नवीन घरात जाण्याचा योग येतो. काही असो. घर ही बाब माणसाच्या आयुष्यात एक ‘पहेली’ बनून राहिलेली आहे.

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Holi 2024: Five Zodiac Signs Lucky On Rang panchami
होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?

काही वेळेला घराच्या संदर्भात होणारी फसवणूक, कोर्ट-कचेऱ्या, दलाली, कर्ज, कर्जाचे हप्ते, भांडवल उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडी या सर्वाच्या विळख्यात माणूस असा काही जखडला जातो की या सर्व तापत्रयातून निर्विघ्नपणे बाहेर पडणे कठीणच होऊन बसते. कधी कधी तर घर घरघरच लावते आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत..

काय असतं हे घर.. होम, स्वीट होम असा या घराच्या संदर्भात उल्लेख केला जातो. जिथं गेल्यानंतर आपल्या सर्व चित्तवृत्ती प्रसन्न होतात, त्वरित बरं वाटतं, हलकं वाटतं.. असं सगळं काही वाटू देण्याचं सामथ्र्य या घरात असतं. बरं, हे घर तुम्हाला कधीही प्रवेश द्यायला मोकळं असतं. तुमच्यासाठी त्या घरावर ‘नो अ‍ॅडमिशन’ अशी पाटी कधीच नसते. दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी जा.. हे घर तुम्हाला प्रसन्नवदने ‘वेलकम’ म्हणून स्वागताला तयार (च) असतं.

या घराच्या संदर्भातील एक गंमत सांगतो.. आपण राहतो ते घर निर्जीव असतं, असं समजत असाल तर तसं नाही मित्रांनो, हे घर नांदतं, गाजतं, हसतं, खिदळतं, तसंच रडणारं भेकणारं, आनंदाने हेलकावं घेणारं तर कधी खिन्न, मलूल, दु:खी अशा सर्व भाव-भावनांच्या कल्लोळातून गुजरत असतं. फक्त ते पाहायला आणि ओळखायला एका नजरियाची गरज असते.

या घराला बाल्य, युवा, तारुण्य, प्रौढपण आणि वार्धक्य या सर्व स्थित्यंतरातून जावं लागतं. हे घर गात असतं. शिट्टय़ा मारत असतं. हे घर जसं जिवंत असतं तसं एके दिवशी मरतंदेखील.. आणि एक दिवस लेक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतात, हो, इथं एक घर होतं, अगदी नांदतं, गाजतं, पण आज..

आज ही घरं घरांनाच जन्म देऊ लागली आहेत.. हे वाचताना तुम्ही काही तरीच काय.. असं म्हणावंसं वाटेल.. पण ते अगदी खरं आहे. गीतेमध्ये एका श्लोकात म्हटलं आहे की ‘बासांसी जीर्णानी यथा विहाय..’ म्हणजे एकदा का वस्त्र जुनं झाली की त्यांचा त्याग करून नवीन वस्त्रं परिधान करतात, त्याचप्रमाणे घरं जुनी झाली की ती नव्या घरांना जन्म देतात.. सध्या मोठाल्या शहरात धूमधडाक्यात सुरू असलेले पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टी वस्तीच्या जागी सुरू असलेलं पुनर्वसन प्रकल्प आपल्याला घरांच्या नव्या निर्मिती प्रक्रियेची जाणीव करून देतात. शहरात मोठय़ा प्रमाणावर जमिनी उपलब्ध होत नसल्यामुळे घरांची निर्मिती ही कल्ल २्र३४ होत असते.

‘एकोऽहम बहुस्याम’ मी एक होतो, पण अनेक झालो, असं भगवंतांनी गीतेत म्हटल्याप्रमाणे, घरंदेखील मी एकच होतो, पण अनेकानेक झालो असं म्हणतात.. मी एक होतो म्हणजे एक इमारत, एक चाळ, एक झोपडपट्टी वस्ती पण त्याच जागेवर आज तिप्पट-चौपट-पाचपट घरं तयार होऊ लागली आहेत. हा चमत्कार कसा होतो? हा चमत्कार होतो विकास नियंत्रण नियमावलीच्या अंतर्गत त्या त्या विभागासाठी उपलब्ध होणारा एफ.एस.आय.-चटई क्षेत्रफळ निर्देशांक किंवा बाहेरून विकत घेण्यात आलेला टी.डी.आर. (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स) किंवा फंजिबल क्षेत्रफळ.. यांच्या करिश्मामुळे.. काही असो.. घरंच आता घरांना जन्म देऊ लागली आहेत. तसं काही नसतं तर ही आडवी मुंबई ‘उभी’ कधीच झाली नसती.

तुमच्या फॅमिलीत जितकी माणसं असतील त्यामध्ये नेहमी या घरालादेखील आपण गणितात हातचा एक धरतो ना तसं जमेस धरा.. खरं म्हणजे हे घर तुमच्या कुटुंबाचा एक सभासद असतं. तुम्ही ते माना किंवा नका मानू. तुम्ही जशी आपली मतं इतरांसमोर मांडता, त्यांच्यावर कधी कधी लादता, व्यक्तिगत प्रश्न, समस्या अन्य सभासदांसमोर मांडता आणि त्यांच्याकडून काही समाधानकारक तोडगा निघेल म्हणून त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहता, तसंच हे घर आपल्या व्यथा, आपल्या अडचणी, दु:खं तुमच्यासमोर विविध मार्गाने मांडत असतं.. पण तुम्ही त्याच्याकडे ढिम्म म्हणून बघायलाही तयार नसता. तुम्हाला तुमचा समस्या असतात तशा त्या घराला नसतात असं थोडंच आहे.. पण तुम्ही ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसता. इन फॅक्ट तुम्ही घराला जमेसच धरलेलं नसतं.. कारण ते निर्जीव असतं ना.. आपल्यासारखं हाडामासाचं थोडंच असतं.. ते आपल्यासारखं थोडंच बोलतं.. पण इथंच थोडीशी गफलत होते.. घर आपल्याला अनेकविध प्रकारे आपल्या व्यथा, अडचणी सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतं.. पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्याकडे म्हणजे त्या घराकडे कानाडोळा करता.. काही वेळेला तर त्याच्यावरच डोळे वटारता.. काही वेळेला त्याला रागे भरता आणि त्याला सांगता ‘चूप बैस.. काही बोलू नकोस.. आम्हाला तुझं काहीच ऐकायचं नाही..’

एवढं काय सांगायचं असतं घराला आपल्याला, कशासाठी ते आपले लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतं.. पण आपण त्याच्याकडे नाही म्हणजे नाहीच लक्ष देत आणि एक दिवस ते पडतं.. कोसळतं.. कोलॅप्स.. घराचीही पडण्यापूर्वी खूप आधीपासून तयारी चाललेली असते.. आणि ते आपली टेल, टेल तुम्हाला विविध पद्धतीने सांगत असतं.. तुम्हाला सावधान करण्याचा प्रयत्न करीत असतं.. पण तुम्ही इतके केअरलेस असता की त्या घराचं काही ऐकतंच नाही आणि मग शेवटी ‘अकस्मात होणारं होऊन जातं!

मी मघाशी म्हटल्याप्रमाणे ते आपल्या कुटुंबापैकीच एक असतं.. त्याला नेमकं कुणी उभं केलेलं आहे तेही आपल्याला कधी कधी ठाऊक नसतं.. काहीही असो. जेव्हा तुम्ही त्यात राहत असता तेव्हा ते घर तुमच्याबरोबरच वाटचाल करत असतं.

बाहेरच्या जगात तुम्ही कितीही तलवारी मारा किंवा कुणीही तुमचा अपमान करो, टाकून बोलो किंवा तुम्हाला एखाद्या स्पर्धेत हरवो किंवा तुम्ही त्यात जिंका.. सर्व परिस्थितीत हे घर तुमच्यासोबतच असतं. जिंकलात तर तुमचं ते स्वागत करतं आणि हरलात तरीही ते स्वागतच करतं.. आणि म्हणत असतं.. जाऊ दे रे, कशाला एवढं मनाला लावून घेतोस.. बेटर लक नेक्स्ट टाइम.. पुन्हा एकदा प्रयत्न कर यशस्वी होशील.. अशा शब्दात ते घर तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करीत असतं.. तुमच्या कठीण प्रसंगी सारे जण तुम्हाला अगदी सोडूनच जातात. भाऊ-बहीण, मित्र, आप्तेष्ट.. पण हे घर मात्र तुम्हाला कधीही एकटं पाडत नाही.. ते म्हणत असतं.. पण मी आहे ना तुझ्याबरोबर..

तुम्ही कधी तरी अगदी लक्ष देऊन, जाणीवपूर्वक त्या घराच्या आढय़ाकडे, भिंतीकडे बारकाईने पाहिलंय.. कधी हात फिरवलाय त्या घराच्या भिंतीवरनं.. नाही ना.. मग आता तरी उठा.. लगेच उठा आणि त्या भिंतीवरून प्रेमाने, मायेने हात फिरवून त्याला म्हणा.. सॉरी, चुकलंय माझं.. आपण आज इतकी र्वष एकत्र राहतो. मी तुला कधी ओळखलंच नाही.. कधी ओळखण्याचा प्रयत्नही केला नाही.. आय अ‍ॅम सॉरी असं म्हणून तुम्ही प्रेमानं त्याच्या पाठीवरून आय मी भिंतीवरून हात फिरवायला लागलात ना की बघा..ते उभं घर रडायलाच लागतं आणि बघता बघता तुमच्या डोळ्यांचाही कधी समुद्र होतो तेही कळत नाही.. आपण हे यापूर्वीच का केलं नाही, या घराला आपलं का मानलं नाही याची बोच तुमच्या मनाला लागून राहते.

या घराबरोबर तुम्ही कधीही, चुकूनही कसल्याही गमजा करू नका किंवा त्याला हिणवण्याचा प्रयत्न करू नका; आणि जर असं काही केलंत तर एक लक्षात घ्या की या घराला तुमची बरीच रहस्ये ठाऊक असतात. त्यामुळे ते घर तुम्हाला एका क्षणात उघडेनागडे करू शकतं. अगदी तुमच्या जवळच्यांनाही तुमची जितकी रहस्यं आणि गुपितं ठाऊक नसतील तेवढी सगळी सिक्रेट्स या घराने आपल्याजवळ बाळगलेली असतात. ते घर म्हणत असतं, ज्या काही गमजा करायच्या असतील ना त्या इतरांसमोर कर, मला ते काही दाखवू नकोस आणि सांगूही नकोस.. अरे, एवढासा होतास तेव्हापासून तुला मी माझ्या अंगाखांद्यावर खेळवलाय.. तू लहान असताना इतरांची नजर चुकवून माझ्या भिंतीवरची माती उकरून कसा खायचास ते मी या डोळ्यांनी पाहिलेलं आहे; शिवाय तुझ्या बालपणीचे इतर सारे ‘पराक्रम’ मला चांगलेच माहीत आहेत. मी या तुझ्या सगळ्या हरकती निमूटपणे पाहिल्यात आणि सोसल्यातदेखील.. त्याबाबतीत मी माझ्याशीच समजूत घालत आलोय.. जाऊ दे.. होईल मोठा.. आणि सुधारेल कधी तरी. सांगायचं तात्पर्य काय तर हे घर आपल्याला पाहत असतं, टिपत असतं, निरीक्षण करत असतं.. अगदी सी.सी.टी.व्ही.सारखं.

या घरांच्या एकत्र बैठका होतात हे ऐकून. तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. रात्री सगळीकडे निजानीज झाली की ही घरं उठतात आणि एकत्र जमून त्या त्या विभागातील घरं एकमेकांना अगदी उराउरी भेटतात. त्यांचे संवाद सुरू होतात. एक घर म्हणत असतं की, अशा सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाचे परिणाम अंती किती भयावह होतात ते वर्तमानपत्रात आपण अनेकदा वाचत असतो. सबब आपण आपल्याबाबतीत डॉक्टरांकडे जाऊन जसे वार्षिक ‘चेक अप’ करून घेत असतो, तसेच घराबाबतीतही काही वर्षांच्या अंतराने असे चेकअप होणे गरजेचे असते. तपासणीनंतर माणसांच्या बाबतीत मिळतो तो ‘मेडिकल रिपोर्ट’ आणि इमारतीच्या प्रकृतीच्या तपासणीनंतर मिळतो तो ‘स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट’. या रिपोर्टवरून आपली आणि आपल्या इमारतीची घराची स्थिती कशी आहे त्यानुसार पुढील ट्रीटमेंट काय करायची ते आपण ठरवीत असतो, नव्हे तसे ठरविणे गरजेचे असते.

घर ही एक अशी वस्तू किंवा वास्तू आहे की इतर पदार्थ किंवा जिन्नस बाजारात जाऊन पैसे देऊन आपण घरी आणतो तसे घर आणता येत नाही. अख्ख घरच घ्यायचं असतं ना. खरेदी केलेल्या वस्तू आपण बाहेरून आणतो तर घर विकत घेतल्यानंतर आपण त्याच्यात जाऊन राहतो.

एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर त्यामध्ये असणारा एखादा दोष किंवा बिघाड हा त्या त्या वस्तूत, यंत्रात असू शकतो आणि तो दोष ती वस्तू किंवा त्या यंत्राची तपासणी करून असणारा दोष दूर करण्यात येऊन ती वस्तू किंवा ते यंत्र त्वरित वापरात आणलं जाऊ शकतं.. घराच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपले दोष किंवा काही बिघाड नंतरही दिसू लागतात आणि ते दोष घर घेणाऱ्यांना अशी काही घरघर लावते की, आपण कुठून या घर घेण्याच्या फंदात पडलो असेही होऊन जाते.

या प्रश्नाची नीट चिकित्सा केल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की घर ही पैसे देऊन लगेच ‘घरी’ आणण्याजोगी बाबच नाही. या घराला मुळी जमीन लागते. ती जमीन आधी मुळात कुणाच्या नावे आहे याचा सर्च घ्यावा लागतो. कुणीही घर घेण्यापूर्वी असा सर्च वकिलांकडून घेतलेला बराच असतो. कारण तसे न करण्याने पुढे जे टेंशन, डोकेदुखी होणार असते ती टाळण्यासाठी अशी खबरदारी घेणे केव्हाही फायद्याचेच ठरते.

घरासाठी वापरण्यात यावयाची जमीन ही खडकाळ, मुरबाड, ठिसूळ, उच्च भार वाहून नेणाऱ्या वीज खांबाच्या खाली, तळ्याकाठी, नदीकिनारी, स्मशनाजवळ (ज्ञात नसलेल्या), पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या खोल जागेत, हमरस्त्याच्या अगदी जवळ कौटुंबिक वाद असलेली, सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डावर अनेक भूधारकांची नावे दाखविणारी अशी जमीन असली आणि त्याची काहीही खातरजमा न करता स्वस्तात मिळते, घेऊन टाकू, पुढे बघू, असं म्हणून त्यावर घरे बांधून अशी घरे विकत घेण्यात आली तर ही शापित घरे माणसाला अनेक प्रकारे त्रासच देत असतात.

घर विकत घेताना डेव्हलपर, प्रमोटर कोण आहे त्याला घरे बांधण्याचा अनुभव आहे काय? घरे बांधण्यासाठी लागणारी आवश्यक ती मॅनपॉवर आहे काय, त्याची सांपत्तिक स्थिती कशी आहे, घरे बांधून देण्याचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे पाहणे अतिशय आवश्यक असते; परंतु बऱ्याचदा तसे होत नाही आणि मग यथावकाश आसू गाळण्याची पाळी येते. या संदर्भातील तुडुंब उदाहरणे आपण प्रत्यही वर्तमानपत्रातून वाचत असतो.

घर घेताना केवळ जाहिरातींवर विसंबून राहून अगदी जमीन खरेदी करण्यासाठी विकासकाला पैसे देण्याचीही लोकांची तयारी असते. त्यासाठी विकासकाने (बिल्डरने) दिलेल्या तोंडी गोड गोड आश्वासनावर विश्वास ठेवून ठरावीक अंतराने हप्ते भरणाऱ्या महाभागांच्या नंतर असे लक्षात येते की, घर घेण्यासाठी व त्यासाठी जमीन विकत घेण्यासाठी विकासकाला जे पैसे भरलेले असतात ती जमीन कोर्टबाजीत अडकलेली आहे; किंवा तिच्यावर पूर्वीच्या मालकाने काढलेल्या कर्जाचा बोजा (एल्लू४ेु१ंल्लूी) आहे, त्यामुळे घर नको, पण मनस्ताप आवर, असं म्हणण्याची पाळी घर घेणाऱ्यांवर येण्याची शक्यता असते.

सर्वसाधारणपणे कोणताही विकासक स्वत:चे पूर्ण पैसे खर्च करून गृहनिर्माण प्रकल्प साकार करीत नसतो. सार्वजनिक गृहनिर्माण मंडळेही याला अपवाद नाहीत. अर्थात गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी किंवा सुरू झालेले काम पुढे चालू ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. अशा प्रकारचा मोठय़ा प्रमाणावरील निधी उभा करण्यासाठी खासगी विकासक संभाव्य लाभार्थीकडून डिपॉझिट स्वरूपात रकमा वसूल करीत असतात. सार्वजनिक गृहनिर्माण मंडळेही सदनिका वाटपासाठी जाहिरात देताना अर्जाबरोबर संभाव्य लाभार्थीना अनामत सुरक्षा रक्कम भरावयास सांगतात. अर्थात कालांतराने काही अडचणींमुळे प्रकल्प रद्द झाला किंवा अनिश्चित कालावधीकरिता पुढे ढकलण्यात आला तर अशा प्रकल्पातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या संभाव्य लाभार्थीना त्यांनी घेतलेल्या सुरक्षा अनामत रकमेचा परतावा देताना सदर रक्कम व्याजासहित परत करण्याकडे त्यांचा कल नसतो. किंबहुना अर्धी रक्कम  व्याजरहितच परत केली जाते आणि तीदेखील अनेक तगादे लावल्यानंतरच परत केली जाते. काही अर्जदार अशा प्रकरणी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावताना दिसतात. घरांच्या नशिबी जन्माला येण्यापूर्वीच अशा प्रकारच्या तोहमतीला बळी पडण्याचे प्रसंग काही वेळेला येत असतात.

घरबांधणी प्रक्रिया तशी क्लिष्ट आणि किचकटच असते. या घरबांधणीत जाणारे ‘मटेरियल’ वास्तू घटक वेळेवर उपलब्ध होणे आणि तेही पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होणे हा एक मणिकांचन योगच असतो. कधी सीमेंट आहे तर स्टील नाही, स्टील आहे तर विटा नाहीत. खडी आहे तर चुनखडी नाही, तर कधी मजुरांचा अपुरा पुरवठा, मालवाहतुकीच्या साधनांची वेळेवर न होणारी उपलब्धता अशा प्रकारच्या आपत्ती या घरांवर कोसळतच असतात आणि ताबा वेळेवर देण्याचे ‘शेडय़ुल’गाठणे मुश्कील होऊन बसते. या सर्वाचा परिणाम घरांच्या किमती वाढण्यात होतो आणि या वाढीव रकमेचा भरुदड शेवटी ग्राहकांच्या माथ्यावरच मारला जातो. घरांच्या वाटय़ाला येणारे एक मोठे दु:ख म्हणजे त्याचे क्षेत्रफळ ‘एरिया’ मग ते बिल्टअप असो, सुपर बिल्टअप असो किंवा फंजीबल वापरून केलेले बांधकाम असो, त्यामध्ये कमीजास्त नव्हे, कमीच क्षेत्रफळ भरेल अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक गफलती किंवा चुकूनमाकून झालेल्या गफलती किंवा काही अचानक उद्भवणाऱ्या र्निबधामुळे क्षेत्रफळ कमी भरणे असे प्रकार सर्रास होत असतात. समोरची ‘पार्टी’ कोण आहे हे पाहूनही असे प्रकार घडण्याची शक्यता असते.

घरांच्या किमती वाढणे हा भोग तर घरांच्या वाटय़ाला सदोदित येतच असतो. बरे या किमतीत काही थोडी थोडकी नव्हे तर घर विकत घेणाऱ्याचे कंबरडे मोडणारीच ती वाढ असते. त्यामुळे जास्तीची रक्कम उभी करणे, दागदागिने गहाण ठेवणे, ते प्रसंगी विकणे, बँकेकडून चढय़ा दराने कर्ज घेणे किंवा अन्य मार्गाने कर्ज उचलणे, इत्यादी आपत्तीस घर घेणाऱ्यास तोंड द्यावे लागते. सगळी आर्थिक गणिते जमविल्यानंतर अगदी अखेरच्या टप्प्यात जर घराच्या किमतीत होणारी वाढ असेल आणि ती दुर्दैवाने होतच असते तर अशा वेळी ती वाढ उंटाच्या पाठीवरची शेवटची काडीच ठरते. घर माणसाला कसे ‘घरघर’ लावते याची प्रचीती त्या वेळी आल्यावाचून राहत नाही. ‘घर पाहावं बांधून’ या म्हणीतील प्रखर वास्तवाची जाणीव अशा वेळी घर करून देत असते.

वेळेवर आणि विनाआपत्ती घर बांधून पूर्ण होईल तर ते घर कसले? म्हणून तर ‘घर पहावं बांधून’ ही म्हण रूढ झाली असावी. घरबांधणी योजना जाहीर होते. लोक अगदी हिय्या करून, उधार उसनवारी करून घराचं ‘बुकिंग’ करून टाकतात आणि पुढील हप्ता कधी भरायला लागेल याची वाट पाहत बसतात. अशीच एक-दोन वर्षेही निघून जातात. योजना पुढे सरकण्याचे नावही घेत नाही आणि मग एक दिवस ती बातमी येते की, घरबांधणी योजनाच रद्द झाली आहे. थँक गॉड.. हा धक्का पचविणे जरी अवघड असले तरी जीवावर बेतले होते, पण बोटावर निभावले म्हणून घराच्या फायनल किमतीपोटी कर्ज काढून मोठी रक्कम भरलेली नसल्यामुळे हा अचानक बसलेला धक्का थोडा तरी सुसह्य़ होतो. मोठी रक्कम भरली गेली आणि काही कारणास्तव घरबांधणीची योजनाच बारगळली तर अशा प्रसंगी विकासक/ प्रवर्तकांकडून किंवा गृहनिर्माण मंडळाकडे भरलेल्या रकमेचा परतावा वेळेवर मिळणे दुरापास्तच होऊन बसते. त्यामुळे घराच्या विक्रीची किंमत भरली; परंतु घराची योजनाच रद्द झाली म्हणून भरलेले परत मिळणे, वसूल करणे हा काय तापदायक अनुभव असतो तो जावे त्याच्या वंशा तेव्हा (च) कळे. ‘भीक नको पण कुत्रा आवर’, पण भरलेली रक्कम तरी लवकर परत करा म्हणून आर्जवं करावी लागतात..

मानवी जीवनाशी अशा प्रकारे संवेदनशीलरीत्या निगडित असणारे हे घर मोठय़ा रकमेची उलाढाल करावयास लावणारे असते, इतकेच नव्हे तर आयुष्यातील अनेक महत्त्वाचे म्हणून घेतल्या गेलेल्या निर्णयापैकी एक निर्णय घ्यावयास लावणारे असते आणि या निर्णय प्रक्रियेत जरा कुठे अज्ञान, ढिलाई बेपर्वाई, चालढकल झाली किंवा ती केली गेली तर पुढे आयुष्यातील एका मोठय़ा मानसिक धक्क्य़ास सामोरे जाऊन त्यातून पुन्हा सहीसलामत बाहेर पडणे एक दिव्यच असते. ‘अतएव सावधान’ होम स्वीट होम..

(लेखक म्हाडाचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे माजी सदस्य आहेत.)

आज ही घरं घरांनाच जन्म देऊ लागली आहेत.. हे वाचताना तुम्ही काही तरीच काय.. असं म्हणावंसं वाटेल.. पण ते अगदी खरं आहे. गीतेमध्ये एका श्लोकात म्हटलं आहे की ‘बासांसी जीर्णानी यथा विहाय..’ म्हणजे एकदा का वस्त्र जुनं झाली की त्यांचा त्याग करून नवीन वस्त्रं परिधान करतात, त्याचप्रमाणे घरं जुनी झाली की ती नव्या घरांना जन्म देतात.. सध्या मोठाल्या शहरात धूमधडाक्यात सुरू असलेले पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टी वस्तीच्या जागी सुरू असलेलं पुनर्वसन प्रकल्प आपल्याला घरांच्या नव्या निर्मिती प्रक्रियेची जाणीव करून देतात.

तुमच्या फॅमिलीत जितकी माणसं असतील त्यामध्ये नेहमी या घरालादेखील आपण गणितात हातचा एक धरतो ना तसं जमेस धरा.. खरं म्हणजे हे घर तुमच्या कुटुंबाचा एक सभासद असतं. तुम्ही ते माना किंवा नका मानू. तुम्ही जशी आपली मतं इतरांसमोर मांडता, त्यांच्यावर कधी कधी लादता, व्यक्तिगत प्रश्न, समस्या अन्य सभासदांसमोर मांडता आणि त्यांच्याकडून काही समाधानकारक तोडगा निघेल म्हणून त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहता, तसंच हे घर आपल्या व्यथा, आपल्या अडचणी, दु:खं तुमच्यासमोर विविध मार्गाने मांडत असतं..