आपल्याला टॉयलेट ब्लॉकचं इंटिरिअर डिझाइिनग हे ऐकायला काहीसं विचित्र आणि हास्यास्पद वाटत असलं, तरी घराचा हा भाग मोठय़ा निगुतीनं सजवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. किंबहुना मागच्या भागात म्हटल्यानुसार खरं तर हल्ली तो एक स्टेटस सिंबॉल मानणारेही बरेच आहेत. कोणाची मतं काहीही असली, तरी आकर्षक रंगसंगतीतला विविध प्रकारच्या सजावटीच्या माध्यमातून सजवलेला हा टॉयलेट ब्लॉक बघणाऱ्याला भुरळ पाडतो हे मात्र निश्चित! तसंच हौसेला मोल नसल्यामुळे त्याची सजावट करावी तेवढी थोडीच आहे.
आता हे कसं करायचं हे पाहताना त्याची सुरुवात आपण टॉयलेट ब्लॉकमधल्या फ्लोअिरग आणि भिंतीवरच्या टाइल्सपासून करूया. स्वयंपाकघराप्रमाणेच टॉयलेट ब्लॉकसाठीही १५ इंच बाय १० इंच या आकारातल्या किंवा १८ इंच बाय १२ इंच या आकारातल्या टाइल्स लावल्या जातात. सर्वसाधारणपणे, पूर्वीच्या काळी बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये ३ फूट किंवा १ मीटर उंचीपर्यंतच टाइल्स लावल्या जात, त्यावरच्या भिंतीवर रंग लावला जात असे. हा रंगही बऱ्याचदा ऑइलपेंट असे. कारण बाथरूममध्ये अंघोळीसाठीच्या गरम पाण्याची वाफ तसंच कपडे धुताना उडणारं साबणाचं पाणी यामुळे भिंत स्वच्छ करणं सोपं जावं म्हणून अशा प्रकारे बाथरूमच्या भिंतीवर अध्र्या उंचीपर्यंतच टाइल्स लावल्या जात. त्याला ‘डॅडो’ असं म्हटलं जायचं. आजच्या काळात ही डॅडोपद्धत बंद झाली असली, तरी या डॅडोच्या उंचीवर २४ इंच बाय ४ इंच आकाराची एखादी आकर्षक बॉर्डरपट्टी बसवली जाते आणि त्यावर मग उर्वरित उंचीपर्यंत म्हणजे बाथरूमच्या छतापर्यंत दुसऱ्या डिझाइनच्या टाइल्स बसवल्या जातात. या टाइल्स निवडताना बॉर्डरपट्टीच्या खालच्या डॅडोच्या भागातल्या टाइल्स या थोडय़ा डार्क म्हणजेच गडद रंगाच्या, तर त्याच्या वरच्या भागातल्या टाइल्स या ब्राइट म्हणजेच फिक्कट रंगाच्या निवडल्या जातात. कारण िभतीचा खालचा भाग हा साबण, शँपू, तेल अशा पदार्थामुळे जास्त खराब होतो. त्यामुळे तिथे जर गडद टाइल्स नसतील त्या लवकर खराब झाल्यामुळे वरचेवर स्वच्छ कराव्या लागतील, तसंच त्या घासून काढण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागेल. पण वरच्या भागाला जर गडद रंगातल्या टाइल्स बसवल्या, तर खिडकीतून येणारा प्रकाश जसा ब्राइट रंगाच्या टाइल्सवरून परावर्तीत होऊन बाथरूममध्ये उजेड येतो, तसा येणार नाही व त्यामुळे बाथरूम काळोखी वाटेल. डॅडोच्या भागातल्या टाइल्सना मिळत्याजुळत्या अशा टाइल्स जमिनीवर बसवल्या जातात. पण भिंतीवरच्या टाइल्स या गुळगुळीत असतात, तर जमिनीवरच्या टाइल्स या पाण्यात पाय घसरून पडायला होऊ नये म्हणून थोडय़ा खरखरीत असतात. म्हणूनच त्यांना अँटिस्कीड अर्थात घसरण्याविरोधी टाइल्स असं म्हणतात. भिंतीवरच्या टाइल्स गुजरात प्रकारच्या असतील, तर मुंबईतल्या धारावीतल्या बाजारात १८ इंच ७ १२ इंच या आकारातल्या सहा टाइल्सचा एक बॉक्स ४०० रुपयांपासून अधिक किमतीला मिळतो, तर १५ इंच ७ १० इंच या आकारातल्या टाइल्सचं तितक्याच संख्येचा एक बॉक्स हे ३०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. नामांकित ब्रँडच्या याच आकारातल्या टाइल्स मात्र कधीकधी दुपटीने महाग असतात. जमिनीवरच्या अँटीस्कीड टाइल्सचं १ फूट बाय १ फूट या आकाराच्या १० टाइल्सचा बॉक्स साधारणपणे ३०० ते ३५० रुपयांपासून पुढे मिळतो. २४ इंच बाय ४ इंच आकाराच्या बॉर्डरपट्ट्या डिझाइनशिवाय एकाच रंगातल्या असतील, तर प्रतिफूट ३५ ते ४० रुपयांना, तर डिझाइन असलेल्या पट्टय़ा प्रतिफूट ६० ते ७० रुपयांना मिळतात. बाथरूम तसंच टॉयलेटच्या दरवाज्यांना काळ्या ग्रॅनाइटच्या किंवा हिरव्या संगमरवराच्या पट्टय़ा बसवल्या जातात. या पट्टय़ांच्या कडांना अर्धवर्तुळाकार आकार दिला जातो. त्याला मोल्डिंग असं म्हणतात. या मोल्डिंगचा भाव प्रतिफूट २५ ते ३० रुपये इतका असतो.
प्लंबिंगची विविध फिटिंग्ज म्हणजेच विविध प्रकारचे नळ बाजारात उपलब्ध असून खरं तर यामुळेच बाथरूम टॉयलेटची शोभा वाढते. बाथरूममध्ये गरम आणि थंड पाणी मिसळणारे स्टेनलेस स्टीलचे मिक्सर नळ हे विविध आकर्षक डिझाइन्समध्ये दीड हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. बेसिनमध्येही अशा प्रकारचे मिक्सर नळ बसवायचे असतील, तर ते १३०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. टॉयलेटमधले वॉशिंग जेट स्प्प्रे हे साध्या कंपन्यांचे दोनशे रुपयांपासून, तर नामांकित कंपन्यांचे एक हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. बाथरूममध्ये पाठीला पाण्याने मसाज करायचं असेल, तसंच डोक्यावरचा शॉवर, हातातला शॉवर आणि बालदीत पाणी काढून घेण्यासाठी असलेला नळ ज्याला प्राऊट असं म्हणतात. अशा सर्व गोष्टी एकत्र हव्या असतील, तर एकाच उभ्या पॅनेलमध्ये येतात [छायाचित्र (१)]. साध्या कंपन्यांची अशी पॅनेल्स ८ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर नामांकित कंपन्यांची पॅनेल्स ६० हजार रुपयांपासून मिळतात. एफएम रेडिओ ऐकताऐकता विविधप्रकारच्या सुवासिक तेलांनी एरोमा थेरपी वापरून जर मनसोक्त अंघोळ करायची असेल, तर लाखाच्या घरात उपलब्ध असलेली बंदिस्त खोल्यांसारखी शॉवर क्युबिकल्सही बाजारात मिळतात. त्यामुळे बाथरूममधला ओला आणि सुका भाग वेगळा ठेवता येतो व संपूर्ण बाथरूम ओलं होत नाही [छायाचित्र (२)]. कारण अंघोळ बंदिस्त क्यबिकलमध्ये केली जात असल्यामुळे उर्वरित बाथरूम सुकं राहतं. जर संगीताच्या तालावर नाचणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये बसून या पाण्याच्या फवाऱ्यांच्या दाबाने अंगाला मसाज करून घ्यायचा असेल, तर जॅकोझी बाथटब्जसही बाजारात उपलब्ध आहेत. यात अंघोळ करताना टीव्ही पाहायचीही सोय असते. [छायाचित्र (३)] एक-दीड लाखापासून ते अगदी आठ साडेआठ लाखा रुपयांपर्यंत एका माणसासाठी किंवा संपूर्ण चार ते सहा माणसांच्या कुटुंबाकरता असे बाथटब किंवा बाथपूल बाजारात उपलब्ध आहेत. बेसिनही विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात. काही बेसीन तर, काचेची असल्यासारखी दिसतात [छायाचित्र (४)]. टॉयलेट ब्लॉकच्या छताला डिझाइन असलेलं फायबर ग्लासचं फॉल्स सिलिंग बसवून त्याच्या आतल्या बाजूने दिवे बसवले, तर हे डिझाइन उजळून निघतं. [छायाचित्र (५)]. अशा सर्व बाथरूम-टॉयलेटना अ‍ॅल्युमिनिअमच्या अ‍ॅनोडाइज्ड फ्रेममध्ये आकर्षक दृश्य किंवा एकाहून एक सुंदर डिझाइन असलेले बॅकेलाइटचे दरवाजे पाऊण जाडीच्या अ‍ॅल्युमिनिअम फ्रेममध्ये १५०० रुपयांपासून तर, दीड इंच जाडीच्या अ‍ॅल्युमिनिअम फ्रेममध्ये १८०० रुपयांपासून उपलब्ध असतात. जुन्या लाकडी पॅनेल्ड जड दरवाजांऐवजी तुलनेने वजनाला हलके असलेले पीव्हीसीचे पॅनेल्ड दरवाजे २५०० रुपयांपासून बाजारात मिळतात. बसवता येतात. लाकडी दरवाजे पाण्यामुळे कुसण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दरवाजे आजच्या काळात लोकप्रिय होताना दिसता आहेत. बेसिनवरचे आरसेही विविध डिझाइनर आकारांमध्ये आणि काचेच्या बीड्ससह मिळतात. [छायाचित्र (६)]. १८ इंच बाय २४ इंच या आकारातले साधे आरसे ७५० रुपयांपासून तर डीझायनर आरसे १५०० रुपयांपासून मिळतात. ते ३० इंच बाय ३० इंच या आकारातले साधे आरसे १४०० रुपयांपासून, तर डिझाइनर आरसे २००० रुपयांपासून मिळतात.
हे सगळं बघितल्यानंतर हेच जाणवतं की, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे टॉयलेट ब्लॉक सजवताना हौसेला मोल नाही. मात्र, खचितच पाहणाऱ्यांच्या नजरेला असे हे ब्लॉक भुरळ पाडतात आणि आपणही आपल्या घरी असंच काहीतरी करूया असं पाहणाऱ्याला वाटायला लागतं.
सिव्हिल इंजिनीअर
c – anaokarm@yahoo.co.in

Story img Loader