स्वयंपाकघराच्या बाबतीत सर्वजण अंतर्गत सजावट, प्रकाश योजना आणि मॉडय़ुलर किचनसारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत अत्यंत आग्रही असतात. तसेच गॅस-शेगडी, फ्रीज, मायक्राव्हेव व ओव्हनची निवड व जागा निश्चित करताना अधिक चिकित्सकपणा दाखवितात. परंतु स्वयंपाकघरात काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घ्यावयाची दक्षता ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते.

घराचा राहाण्यासाठी ताबा घेताना आपल्या मनात प्रथम विचार येतो की, वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे किंवा नाही. स्वयंपाकघर आग्नेय दिशेस असावे असे वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असण्याला अधिक महत्त्व असण्याचे कारण एवढेच की, त्यामुळे अग्नी तत्त्वात अग्नी वसवला जातो हे प्रमुख कारण आहे.
स्वयंपाकघराच्या बाबतीत सर्वजण अंतर्गत सजावट, प्रकाश योजना आणि मॉडय़ुलर किचनसारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत अत्यंत आग्रही असतात. तसेच गॅस-शेगडी, फ्रीज, मायक्राव्हेव व ओव्हनची निवड व जागा निश्चित करताना अधिक चिकित्सकपणा दाखवितात. परंतु स्वयंपाकघरात काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घ्यावयाची दक्षता ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते. स्वयंपाकघरात वावरताना महिलांनी अधिक सावध व सतर्क असणे आवश्यक आहे. कारण आतापर्यंत जास्तीत जास्त अपघात व दुर्घटना स्वयंपाकघरात घडल्या असून, त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासाठी महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना विशेष काळजी व वैयक्तिक सावधगिरी बाळ्गणे आवश्यक आहे.
(अ) गॅस : पूर्वी घरोघरी मातीच्या चुली होत्या. त्यानंतर स्टोव्ह आला. आता तर घरोघरी गॅस सिलिंडर आहेत. घरात जर दोन गॅस सिलिंडर्स असतील तर दुसरा भरलेला गॅस सिलिंडर स्वयंपाकघरा पासून लांब बाल्कनीत अथवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गॅस कंपनीच्या अधिकृत कामगाराकडूनच गॅस सिलिंडर घ्यावा. गॅस सिलिंडर घेताना गॅस कामगाराकडून गॅस सिलिंडरच्या मुखावरील प्लॅस्टिकचे सिल तोडून घ्यावे व आतील प्लॅस्टिकचे झाकण काढून त्यामध्ये वॉशर असल्याची खात्री करून घ्यावी व पुन्हा प्लॅस्टिकचे झाकण लावून गॅस सिलिंडरचे मुख बंद करावे. असे करताना गॅसचा वास येत असल्यास वा गळती होत असल्याचे आढळ्ल्यास गॅस सिलिंडर त्वरित परत करावा. गॅस कंपनीच्या कामगाराने गॅस सिलिंडर सोबत गॅसची पावती दिल्याबद्दल गॅसच्या पुस्तिकेत त्याच्या नावाची नोंद व सही केल्यावरच गॅसच्या पावतीवर नमूद केलेली रक्कम द्यावी. गॅस सिलिंडरच्या आजूबाजूला रॉकेलचा डबा, रिकामे खोके, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या, इत्यादी ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. ज्या घरात अंघोळीसाठी पाणी गॅसच्या शेगडीवर तापविण्यात येते, अशा वेळी पाणी तापल्यानंतर गॅस बंद करून मगच गरम पाण्याने भरलेले पातेले अत्यंत सावधगिरीने खाली उतरून घ्यावे. असे करताना दोन्ही हातात जाडसर सुती कापड (फडके) असावे. याबाबतीत थोडय़ाशा निष्काळजीपणामुळे उकळते पाणी अंगावर पडून भाजण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
गॅस शेगडीवरील काम पूर्ण झाल्यावर गॅस-सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा. तसेच दररोज रात्री व बाहेर जाताना न चुकता गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा. गॅस शेगडीच्या रबरी नळीची नियमित तपासणी करावी. घरात गॅसचा किंचितसा जरी वास येत असल्यास किंवा रबरी नळीला बारीकसे छिद्र आढळ्ल्यास अथवा रबरी नळी नरम झालेली आढळ्ल्यास त्वरित गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करून गॅस कंपनीच्या मेकॅनिकला बोलावून दोष दुरुस्ती करून घ्यावी. गॅसच्या गळतीबाबत व अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी असलेला गॅस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक स्वयंपाकघरात सर्वास दिसेल अशा ठिकाणी लिहावा/ लावावा.

(ब) विजेची उपकरणे :
अलीकडच्या काळात फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर इत्यादी उपकरणे स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. विजेवर चालणारे कोणतेही नवीन उपकरण घेतल्यावर त्यासोबत देण्यात येणारे मॅन्युअल गाइड अर्थात उपकरण योग्यप्रकारे वापरण्याच्या / हाताळण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना व्यवस्थितपणे वाचून मगच उपकरणाचा काळजीपूर्वक वापर करावा. ओल्या हाताने विजेवर चालण्याऱ्या कोणत्याही उपकरणाचा वापर करू नये. तसेच विजेची बटणे चालू/बंद करू नयेत. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. परिणामी गंभीर दुखापत / दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी स्वयंपाकघरात विजेची बटणे चालू/बंद करताना तसेच विजेची उपकरणे वापरताना रबरी तळभाग असलेला व वरच्या बाजूस सुती अथवा अन्य मुलायम फायबर असलेला मॅट ( पाय पुसणे ) पायाखाली असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

(क) धारदार उपकरणे :
प्रत्येक स्वयंपाकघरात भाजी चिरण्यासाठी व अन्य कामासाठी विळी, कोयता, सुरी, कात्री इत्यादी धारदार उपकरणे असतात. ही उपकरणे काम होताच सुरक्षित ठिकाणी ठेवावी. विळी कधीही उघडी ठेवू नये. विशेषत: घरात लहान मुले असल्यास उघडी विळी व अन्य धारदार उपकरणामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे महिलांनी या वस्तू जागच्या जागी ठेवण्याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
how VVPAT works
विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा

(ड) वैयक्तिक खबरदारी :
*
महिलांनी स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर करताना सुती कपडे वापरावेत. नॉयलॉनची साडी अथवा ड्रेस/ओढणी लवकर पेट घेते आणि पेट घेतल्यावर त्वचेला चिकटते. त्यामुळे गॅस शेगडीचा वापर करताना नॉयलॉन व तत्सम कपडे परिधान करणे टाळावे.
* गॅसच्या शेगडीवरून गरम पाण्याचे, दुधाचे पातेले किंवा स्वयंपाकाची अन्य गरम भांडी उचलताना धातूची पक्कड/सांडशी वापरावी. घरातील जेष्ठ महिलांना सुती कापडाच्या (फडक्याच्या) सहाय्याने गॅस शेगडीवरून गरम भांडी उचलणे अंगवळणी पडले आहे. अशा वेळी, किमान जाड सुती कापडाचा (फडक्याचा) वापर करावा व ते गॅसच्या ज्वाळा लागून जळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नॉयलॉन व तत्सम कापडांचा वापर कटाक्षाने टाळावा.
* गॅस शेगडीचा वापर करताना महिलांनी हातात प्लॅस्टिकच्या बांगडय़ा घालणे टाळावे. कारण गॅस शेगडीचा वापर करताना हात सतत गॅसच्या जवळ असल्यामुळे हातातील प्लॅस्टिकच्या बांगडय़ा गॅसच्या ज्वाळांच्या संपर्कात आल्यास त्वरित पेट घेण्याचा संभव असतो. त्यामुळे हाताला गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* स्वयंपाकघरातील ओटय़ावरील गॅस शेगडीच्या वरच्या बाजूस भांडी/डबे ठेवण्यासाठी फळी/मार्बलच्या रॅक्स अथवा कपाटे/कॅबिनेटस करू नयेत. कारण स्वयंपाकघराच्या ओटय़ावरील गॅस सुरू असताना घाई गडबडीत रॅक/कपाटातून भांडी अथवा डब्यातील वस्तू काढण्याच्या प्रयत्नात गॅसच्या ज्वाळांचा स्पर्श अंगावरील कपडय़ास होऊन किंवा हातातील भांडे/वस्तू जळत्या गॅसच्या शेगडीवर पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* बहुतांश घरात देवघर / देव्हारा स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे घरातून बाहेर जाताना समई-निरांजन इत्यादी पेटते ठेवून जाऊ नये कारण उंदीर/घूस यांसारखे प्राणी पेटती वात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
* अलीकडच्या काळात, घरोघरी ‘व्हरटीफाइड / स्पारटेक्स’ लाद्या बसविल्या जात आहेत. या लाद्या दिसायला सुंदर व चकचकीत आहेत, पण तेवढय़ाच गुळगुळीत असल्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या लाद्यांवर पाणी किंवा तेल सांडल्यास दिसून येत नाही. त्यामुळे स्वयंपाकघरातील लाद्यांवर पाणी, तेल किंवा अन्य जल पदार्थ सांडल्यास ताबडतोब लाद्या पुसून स्वच्छ कराव्यात अन्यथा पाय घसरून गंभीर स्वरूपाचा शारीरिक अपघात होण्याची शक्यता आहे.
* स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर करताना महिलांनी आपले केस मोकळे न ठेवता बांधून ठेवण्याची सवय लावणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
* वरील सर्व सावधगिरीचे उपाय व उपयुक्तता घरातील मोलकरीण तसेच पोळ्या करण्यास येणाऱ्या बाईस पटवून देणे व आचरणात आणणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरातील सुरक्षिततेबाबतची सर्व मार्गदर्शक तत्त्वे व सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास संभाव्य अपघात/ दुर्घटना सहज टाळता येणे शक्य आहे.
vish26rao@yahoo.co.in