आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेयर बाजाराने

रिलायंस इंडस्ट्रीज आपला दुसऱ्या तिमाहीतील नफा आज जाहीर करण्याची चिन्हे आहेत. परंतु या तिमाहीत असणारा नफा हा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत इतका चांगला नसल्याने रिलायंस इंडस्ट्रीजसाठी हि काही चांगली बातमी नाहीये. रिलायंस इंडस्ट्रीजच्या एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचे …

रिलायंस इंडस्ट्रीज आपला दुसऱ्या तिमाहीतील नफा आज जाहीर करण्याची चिन्हे आहेत. परंतु या तिमाहीत असणारा नफा हा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत इतका चांगला नसल्याने रिलायंस इंडस्ट्रीजसाठी हि काही चांगली बातमी नाहीये.

रिलायंस इंडस्ट्रीजच्या एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचे प्रमाण मागच्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तिमाहीत कमी होता. कंपनीच्या नफ्यात घसरण होण्याची हि गेल्या दोन वर्षातील दुसरी वेळ आहे. तज्ञांच्या मते कंपनीच्या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या उपकंपन्या रिलायंस रिफायनरीज आणि रिलायंस पेट्रोकेमिकल्स या बर्याच काळापासून तोट्यात असल्याने त्याचा परिणाम रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेयर्सवर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजच्या या एकत्रित नफ्यात बाकीच्या उपकंपन्या नफ्यात चाललेल्या असल्याने त्यांचा सहभाग जास्त आहे. आणि हा नफा याच कंपन्यांमुळे रिलायंस इंडस्ट्रीजला गेल्या काही तिमाहींमध्ये झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतातील बाजार भांडवलीकरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीजला गेल्या ३ वर्षात दोनदा अशा गोष्टींचा सामना करावा लागतोय ही फार चिंताजनक बाब आहे.

विविध ब्रोकरेज कंपन्यांनी असे भाकीत वर्तवलेय की, दरवर्षी कंपनीच्या होणाऱ्या एकत्रित नफ्याचा विचार करता २२% ची घसरण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्याची किंमत जवळपास ४४०० करोड रुपये असल्याचे बोलले जात आहे. विक्रीच्या आकड्यात गेल्या वर्षीपेक्षा ५ % ची वाढ होऊन त्याचा आकडा ८५,३०० करोड रुपये इतका जाण्याची शक्यता आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजच्या या परिस्थितीबद्दल बँक ऑफ अमेरिकेच्या मेरील लिंच असे नमूद करतात, आम्हाला फक्त याच गोष्टीची चिंता आहे की, जागतिक आर्थिक मंदीचा रिलायंस इंडस्ट्रीजला मोठा फटका बसू शकतो आणि त्यातल्या त्यात पेट्रोकेमिकल्स आणि जीआरएमला (ग्रॉस रिफायनरी मार्जिन) जास्त बसू शकतो. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात २०१३ च्या आर्थिक वर्षात अजून घट होऊ शकते. रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल्समधील कमकुवतपणा याधीच बँकेने वर्तवला होता आणि तो बऱ्याच प्रमाणात खराही ठरलेला आहे. बँकेच्या मते ग्रॉस रिफायनरी मार्जिनच्या संख्येत जर समाधानकारक वाढ झाली तर या कंपन्याही येत्या काही काळात नफ्यात जातील.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेयर बाजाराने रिलायंस इंडस्ट्रीजचे शेयर्स ३.५ % ने घसरले आहेत. रिलायंस कॅपिटल एसेट मॅनेजमेंट जी रिलायंस इंडस्ट्रीजची म्युच्युअल फंड्सची उपकंपनी आहे. ही कंपनी मात्र सर्व भाकिते खोटी ठरवत मागच्या वर्षीपेक्षा जास्त नफ्याची नोंद करील अशी अपेक्षा आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत रिलायंस इंडस्ट्रीजचा नफा कदाचित २४ % नी घसरेल असा अंदाज शेयर बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vastu rang news

ताज्या बातम्या