संहिता जोशी

सांगोवांगीच्या अनेक गोष्टी एकत्र करून विदा तयार होत नाही. ‘संपूर्ण विदा’ म्हणजे एखाद्या गोष्टीला किती सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि किती मिळाला नाही, याचीही माहिती. मग त्यातून प्रतिसाद देणारे आणि न देणारे या गटांसाठी निरनिराळ्या प्रकारची नीती आखता येते.. कुणापुढे कशा प्रकारच्या बातम्या ठेवाव्यात, हाही याच नीतीचा भाग!

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

माझं औपचारिक शिक्षण, पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; फलज्योतिषाबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत असत. ‘‘अमक्या ज्योतिषांनी केलेलं तमकं भाकीत अगदी बरोबर ठरलं, तरीही तुम्ही फलज्योतिष का नाकारता?’’ विदाविज्ञानाच्या बाबतीतही हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

ते कसं? हे या संदर्भात बघायचं तर प्रश्न थोडा बदलून बघू.

(१) एका मत्रिणीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, वेळप्रसंगी मत्रीच्या नात्याचा दबाव आणून मतदानाला नेलं. यात मत्री, नात्यांमधून येणाऱ्या भावनांचा उपयोग केला. किंवा माझं भावनिक भांडवल खर्ची घातलं. (२) ‘लोकसत्ता’मध्ये लेखात ‘लोकहो, आपलं नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करा,’ असं म्हटलं. यात ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्राला जी प्रतिष्ठा, मान्यता आहे, तिचा वापर झाला. (३) फेसबुकवर I voted (मी मतदान केलं) असं म्हणणं अगदीच निराळं. यात पहिल्या उदाहरणासारखं माझं भावनिक भांडवल खर्च झालंच, त्यात फेसबुकची लोकप्रियता उपयुक्त ठरली आणि त्या बदल्यात फेसबुकला आपल्याबद्दल माहिती समजली. फेसबुकनं मला असं काही बटण दाखवलं की, मी ते वापरण्याची शक्यता किती, याची गणितं फेसबुकला करता आली. माझ्या ओळखीतल्या किती लोकांनी हे बटण वापरलं याची माहितीही फेसबुकला मिळाली. असे खरोखरचे सामाजिक प्रयोग फेसबुकच्या विदावैज्ञानिक-सामाजिक शास्त्रज्ञांनी केले आहेत.

आणि, किती लोकांनी हे बटण वापरलं नाही याचीही माहिती फेसबुकला मिळाली. विदाविज्ञानात अशी ‘संपूर्ण’ विदा नेहमीच जमा केली जाते असं नाही; बहुतेकदा नाहीच.

यांतली पहिली दोन उदाहरणं म्हणजे फार तर सांगोवांगी आहे. म्हणजे मत्रिणीला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिनं मतदान केलं, ही सांगोवांगीची घटना झाली. यात असत्य काही नसलं तरीही ही विदा नव्हे, एक विदािबदू आहे. एका व्यक्तीबद्दल माहिती आहे. वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून आवाहन केलं म्हणून कोणी किंवा किती लोकांनी मतदान केलं, याची माहिती मिळवणं फारच कठीण आहे.

‘संपूर्ण विदा’ म्हणजे काय? फेसबुकवर काही लोकांनी ‘मी मतदान केलं’ हे बटण वापरलं आणि अनेक लोकांनी वापरलंच नाही. या दोन्हींची नोंद फेसबुकच्या विदागारात (डेटाबेस) झाली. किती लोक प्रसारणशील आहेत, आपल्या नागरी कर्तव्यांबद्दल फक्त जागरूकच नाहीत तर त्याबद्दल जाहिरात करण्यासाठीही उत्सुक आहेत, याची माहिती फेसबुकला मिळाली. या लोकांना जाहिराती दाखवताना कोणत्या प्रकारच्या असाव्यात, याचं गणित फेसबुकला करता येईल. हे लोक काय प्रकारच्या बातम्या फेसबुकवरून प्रसृत करतात किंवा स्वत काय लिहितात यावरून त्यांचा राजकीय कल काय आहे, हेही समजेल. समजा कोणी सत्ताधारी पक्षाचे समर्थक असतील, पण आपल्या मतदानाची जाहिरात करत नसतील, तर त्यांना राजकीय जाहिराती आणि बातम्या किती दाखवाव्यात हे ठरवता येतं.

बातम्या म्हटल्या की त्या निष्पक्ष असाव्यात अशी अपेक्षा असते. तो विषयही रोचक आहे, पण या सदराच्या आवाक्याबाहेरचा आहे. काही बातम्या ‘पेडन्यूज’ही असतात. ठरावीक बातमी पसरवण्यासाठी, किंवा ठरावीक संस्थळावरच्या बातम्या पसरवण्यासाठी फेसबुकला पैसे देता येतात. हे फेसबुकच्या, गुगलच्या व्यवसायाचं मॉडेल आहेच. ‘मी मतदान केलं’ म्हणणाऱ्या लोकांना या बातम्या जास्त दाखवल्या तर त्या जास्त पसरण्याची शक्यता आहे.

एवढंच नाही, समजा मी मतदानाचं बटण वापरलं; शिवाय माझ्या मैत्रयादीतल्या इतर काही लोकांनीही हेच बटण वापरलं. अशा ‘पेड राजकीय बातम्यां’पैकी काही बातम्या मी आणि बटणवापरकर्त्यांपैकी कोणी शेअर केल्या, की आम्ही गळाला सहज लागलेले मासे ठरतो. बुडत्याचा पाय खोलात म्हणावं तशी परिस्थिती. एकदा अशा पेड न्यूज बघितल्या की त्या सतत येत राहतात. यात कोणत्याही राजकीय पक्षाला डावं-उजवं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. फेसबुकची यंत्रणा कशा प्रकारे चालते आणि तिचा फायदा कसा घ्यावा, हे सगळेच राजकीय पक्ष बघत असतात.

कारण आपण फेसबुकवर असतो. एकदा ठरावीक राजकीय विचारसरणीच्या बातम्या वाचायला सुरुवात केली, की तशाच बातम्या समोर दिसत राहतात. आपल्या विचारसरणीच्या बाहेरचं काही आपल्याला दिसत नाही; आपल्या विचारकुपांमध्ये (एको चेम्बर) आपण अडकून राहतो. ‘पेडन्यूज’ आणि विचारकुपांचा एकत्र परिणाम असा होतो की, आपल्या लाडक्या नेत्यानं किंवा अभिनेत्यानं समजा मनुष्यवधासारखा मोठा गुन्हा केल्याचा खटला न्यायालयात दाखल झाल्यावर आपल्यासमोर बातमी येते, ‘या माणसावर आरोप झाला आहे’.

ही विचारकुपं निरनिराळ्या प्रकारची असतात. आपला लाडका नेता /अभिनेता न आवडणारेही लोक असतात. त्यांना बातमी दिसेल, ‘या माणसाला मनुष्यवधासाठी फाशी होण्याची शक्यता.’ घटना एकच असते. पण तिची मांडणी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी दिसते. कारण, पुन्हा जाहिराती. आपल्याला नावडणारा माणूस गुन्हेगार आहे, असं म्हटलेलं आपण चवीचवीनं वाचू, पण नावडता माणूस निर्दोष असण्याची शक्यता आहे, असं सुचवणाऱ्या बातम्यांवर क्लिक करू का? आपण त्यावर क्लिक केलं नाही तर आपल्याला जाहिराती कशा दिसणार?

पण पुढे काय होतं? आपल्याला जे आवडत नाही, ते खरं असेल तरीही आपल्यासमोर येत नाही. अप्रिय गोष्टी टाळण्याकडे सर्वसाधारण माणसांचा कल असतो. पण आपापल्या विचारकुपांमध्ये अडकल्यामुळे अप्रिय गोष्टी घडतच नाही, असं नाही. पण त्यातून ‘आपल्या’ माणसाचा गुन्हा क्षम्य वाटतो, ‘आपल्या बाब्या’ला ठेवलेली नावं म्हणजे शिवीगाळ वाटते. मुळातच अशा विषयांत वस्तुनिष्ठता बाळगणं कठीण असतं, विचारकुपांत अडकल्यामुळे वस्तुनिष्ठतेच्या जागी व्यक्तिनिष्ठ मतंमतांतरं म्हणजे काय ते सत्य असं मानायला सुरुवात होते.

विचारकुपांचे दुष्परिणाम आणखी कसे होतात, हे पुढच्या लेखांत तपशिलात बघूच. या लेखातला मुद्दा असा की, सांगोवांगी म्हणजे विदा नव्हे. उदाहरण म्हणून फेसबुकवरचं ‘मतदान केल्या’चं बटण घेऊ. कोणत्या सदस्यांना हे बटण वापरण्याचा पर्याय दिला; तो पर्याय कोणी वापरला; आणि कोणी तो पर्याय दिसूनही वापरला नाही ही संपूर्ण विदा ठरते. फेसबुकनं लोकांवर राजकीय-सामाजिक प्रयोग करत हे बटण उपलब्ध करून दिलं. त्यांतल्या काही लोकांनीच ते बटण वापरलं, आणि बहुतेकांनी ते बटण वापरलं नाही, ही संपूर्ण विदा वापरून जे निष्कर्ष निघतील ते सांगोवांगीवर आधारित किंवा अर्धवट माहितीवर आधारित नसतील.

ज्योतिषी काही भविष्य वर्तवतात असं आपण म्हणतो त्यात फक्त विदािबदू असतो, सांगोवांगी. किती वेळा भविष्य चुकलं, किती वेळा र्अधच बरोबर आलं किंवा ‘सहा महिन्यांत परदेशगमनाची संधी’ मिळण्याजागी एक वर्षांनं परदेशी गेल्यास तेही ‘कसं बरोबर वर्तवलं’ म्हणतो, तेव्हा ती विदा नसते, सांगोवांगी असते. सांगोवांगीच्या अनेक गोष्टी एकत्र करून विदा तयार होत नाही.

तळटीप : २००८ च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांत फेसबुकमुळे साडेतीन लाख लोकांनी मतदान केलं, असा निष्कर्ष निघाला. भारतात फेसबुकची लोकप्रियता त्यानंतरच वाढीला लागली. आजही लोकांच्या फेसबुक फीडमध्ये काय दिसावं हे कॅलिफोíनयातले फेसबुकचे अभियंते, मार्केटिंगवाले ठरवतात. त्यात कोणत्या बातम्या दिसाव्यात हे ठरवून आपल्या राजकीय विचारसरणीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फेसबुक काही करत नाही, किंवा करणारच नाही, याची खात्री काय?

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com