30 May 2020

News Flash

विकी कौशलला दीपिकाने पती म्हणून नाकारले!


बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणखी एक चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून आपली पात्रे आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही ‘पद्मावती’ या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटातही एका ऐतिहासिक काळावर आणि पात्रांवर भाष्य करणारे कथानक असणार आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X