08 July 2020

News Flash

माझ्यासाठी अनुष्कासोबतचा ‘तो’ क्षण खूप खास- विराट कोहली

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला त्यांचे चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्सने एक असा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे जो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. विराटचं अनुष्कावरचं प्रेम त्याने या व्हिडिओमध्ये दाखवून दिले आहे. तसे ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा विराटने त्याचे प्रेम सर्वांसमोर व्यक्त केले. त्याला जिथे संधी मिळेल तिथे तो अनुष्काबद्दल भरभरून बोलत असतो. पण अनुष्का मात्र सार्वजनिक ठिकाणी विराटचा विषय काढणं जरा टाळतेच. तिने विराटसोबतच्या नातेसंबंधांबद्दल कोणतेही व्यक्तव्य केले नसले तरी तिने कधी विराटच्या नात्याबद्दल नकारही दिला नाही. सध्या ते अनेक पार्टी आणि लग्न सोहळ्यांमध्ये एकत्र जाताना दिसतात.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X