‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असताना यावेळी ‘टीम बी’ एकजुटीने खेळत होती. यावेळी, निक्की-आर्यामध्ये झटापट होऊन आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली असं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे टास्क त्वरीत थांबवण्यात आला. याशिवाय अरबाज आणि निक्कीने संपूर्ण घरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आता थेट ‘बिग बॉस’ या प्रकरणावर निर्णय देणार आहेत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांच्या आणि बाहेरील कलाकारांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण पाहणार आहोत.