बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात १६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानात घुसून अज्ञात दरोडेखोरांनी दुकानदारावर तलवारीने वार केले आणि दुकानातील रोकड घेऊन पसार झाले आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरोड्याच्या घटनेने चिखली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे..