बदलापूर वनक्षेत्रात बिबट्यांचा वावर हा जास्त आहे .सलग दोन ते तीन महिने बिबट्यांनी स्थानिकांच्या अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यातच एक चित्रफीत प्रसारित झाली आहे .या चित्रफितीत बिबट्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या भांड्यात अडकल्याचे दिसून येत आहे हे भांडे काढण्यासाठी बिबट्या प्रयत्नदेखील करत आहे तरी या बिबट्याला शोधण्यासाठी दोन दिवसा पासून मोहीम चालू आहे तरीही अद्याप तो सापडलेला नाही