Subodh Bhave Ganpati: आजपासून गणपती बाप्पांचे (Ganpati Bappa) आगमन होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना कलाकार मंडळींनीसुद्धा आपल्या घरी बाप्पा बसवला आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनीसुद्धा आपल्या पुण्यातील घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. दरवर्षी बाप्पासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा देखावा साकारत भावे कुटुंब गणेशोत्सव (Ganesh Utsav) साजरा करत असतं, यावर्षी त्यांनी ‘चांद्रयान ३’ (Chandrayaan 3) हा देखावा बनवला आहे.