मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की भव्य मंडप,आकर्षक सजावट आणि बाप्पाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी हे चित्र हमखास पाहायला मिळतं. लालबागचा राजा, तसेच गणेश गल्लीसह मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणपती दरवर्षी भक्तांचं लक्ष वेधून घेतात. मात्र यंदा GSB सेवा मंडळाचा महागणपती आपल्या बेशकीमती दागिन्यांमुळे आणि कोट्यवधी रुपयांच्या विमा संरक्षणामुळे चर्चेत आला आहे. याच कारणामुळे या बाप्पाला अनेकदा ‘मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा’, असं म्हटलं जातं.







