आज भारताच्या कानाकोपऱ्यात ज्याचा जयघोष होतो… तो गणराय केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही. श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत, जपान, कोरिया, चीन, कंबोडिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशियापर्यंत… गणरायाच्या प्रतिमा आढळतात, त्याची उपासना केली जाते. पण तुम्हाला माहितीय का गणरायाचं एक कनेक्शन अफगानिस्तानशी देखील आहे. गणपती बाप्पाच्या लोकप्रियतेला मध्ययुगामध्ये साधारणपणे ९-१० व्या शतकात मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली दिसते. गाणपत्य नावाचा संप्रदायच उदयास आला. या लोकप्रिय देवतेच्या मूळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला थेट अफगाणिस्तानापर्यंत पोहोचावे लागतं. पणं असं का, त्यामागची कारणं काय? काबूलच्या मशिदीवर विराजमान ‘महाविनायकाचा इतिहास काय सांगतो सविस्तर पाहूयात.







