ही मुर्ती पाहा… या मुर्तीची उंची आहे ७० फूट, वजन अंदाजे ४५ ते ५० हजार किलो. पुर्वी याच गणपतीच्या हातावर ५००० हजार किलोचा लाडू ठेवायचे. आता अशा भव्यदिव्य गणपतीचा इतिहास पण तितकाच रंजक आहे. गणपती सुरु झाला तेव्हापासून दरवर्षी गणपती उत्सवाचं स्वरुप हे भव्यदिव्य होत गेलं. मंडळं वाढली, आगमन सोहळे सुरु झाले, भव्यदिव्य रोषणाई आली त्याचप्रमाणे गणपतीच्या मुर्तींची उंचीही वाढत गेली. आकर्षक आणि उंच मूर्तींची जणू स्पर्धाच लागलीय. अन् जिथे स्पर्धा सुरु होते, तिथे चर्चा होते की सर्वात मोठा कोण? या व्हिडीओत आपण जाणून घेणार आहोत की, भारतातील सर्वात मोठी गणपतीची मुर्तीचा इतिहास नेमका काय आहे?




