Pimpari Chinchwad Ganpati : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. आपल्या कामाच्या धडाक्याने आणि रोखठोक स्वभावाने जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या अजित पवार यांच्या अचानक निधनाच्या धक्क्यातून अजूनही कार्यकर्ते आणि नागरिक सावरलेले नाहीत. याच भावनांना वाट मोकळी करून देत,
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील तरुण दर्शन सोनवणे याने आपल्या घरगुती गणपतीसमोर एक भावूक देखावा साकारला आहे. ‘दादा तुमची वेळ चुकली, राजकारण लय वंगाळ’ आणि ‘कामाचा माणूस’ या मध्यवर्ती संकल्पनेतून अजित पवार यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील विविध पैलू या देखाव्यातून मांडण्यात आले आहेत.





