कला क्षेत्र म्हटलं की त्यामध्ये अनेक विभाग येतात. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे कला दिग्दर्शन. उभारले जाणारे मोठे सेट, त्याची भव्यता, त्यातील वेगळेपण आणि ते साकारण्यासाठी लागणारं कसब हे सगळं आठवलं की डोळ्यासमोर एका कला दिग्दर्शकाचं नाव आवर्जून येतं ते म्हणजे अमन विधाते. कला दिग्दर्शक अमन विधाते हे गेल्या ३० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. चित्रपटसृष्टी असो किंवा मग गणेश मंडळांसाठी उभारले जाणारे सेट असो त्यांच्या कलाकृतीने कायमच एक वेगळी छाप सोडली आहे. याच पडद्यामागच्या कलाकाराचा असामान्य प्रवास आपण जाणून घेऊ.