इन्फ्लुएन्सरच्या जगातच्या नवव्या भागात आज आपण भेटणार आहोत Red Soil Stories च्या पूजा व शिरीष गवस यांना. मुंबईतील नोकरी सोडून कोकणात वसलेल्या या जोडप्याने गावाकडील खाद्यसंस्कृती, सण व उत्सव जगासमोर आणले आहेत. ४० भाषांमधील प्रेक्षकांचे प्रेम कमावताना प्रत्येक व्हिडिओमागे किती विचार करावा लागतो याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. मराठी मालिकांचे कलाकार जेव्हा त्यांच्या दारी येण्यापासून ते मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वास्तुसंग्रहालयात त्यांच्या कामाची दखल घेण्यापर्यंत त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया या खास भागात..