मुंबईत येईन असं दूर दूर पर्यंत वाटलं नव्हतं. पण मुंबईत आलो तेव्हा गर्दी पाहून मला घाम फुटला होता. पण मुंबई ही सगळ्यांना सामावून घेते. मुंबईत आलो आणि मलाही मुंबईने सामावून घेतलं. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मुंबईला पर्याय नाही असंही वैभव मांगले यांनी म्हटलं आहे. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक मी परेश मोकाशीसोबत केलं. त्याचं माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे असंही वैभव मांगले यांनी सांगितलं. तसंच विविध अनुभवही त्यांनी सांगितले. सहज बोलता बोलता या लोकसत्ताच्या कार्यक्रमात दिग्दर्शक विजय केंकरे यांनी वैभव मांगले यांची मुलाखत घेतली