दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर करिअरच्या पुढील पायरीवर उभे असताना नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही संभ्रम असतो. भविष्यातील करिअरच्या संधींबाबतही चिंता सतावू लागते आणि करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या माध्यमाची विद्यार्थ्यांना गरज भासते. विद्यार्थी- पालकांमध्ये दुवा साधण्याचे काम ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेने पार पाडले. अलिबागमधील कुरुळ येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत ‘ताणतणावाचे नियोजन’ या सत्राअंतर्गत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थी- पालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.