पावसाचा अंदाज चुकला की, आपण वेधशाळेला नावं ठेवतो. पण कधी हे जाणून घेतलंय का की, वेधशाळेचं काम कसं चालतं? पाऊस हे मूळात लहरी खातं, वारा कुठे कसा वाहील, हे कुणीच सांगू शकत नाही. पण गेल्या दोनशे वर्षांमध्ये हवामानशास्त्र हा विषय वैज्ञानिक पद्धतीने चांगला विकसित झाला असून पावसाच्या अंदाजांच्या नेमकेपणात तुलनेने आता चांगला फरक पडला आहे. पण मूळात हा अंदाज व्यक्त करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक उपकरणांचा आधार घेतला जातो आणि ही उपकरणं कसं काम करतात हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण ‘गोष्ट मुंबई’च्या या भागात केला आहे.