शीव म्हणजे वेस किंवा सीमा. पूर्वीच्या ब्रिटिश मुंबईची ही सीमा होती. या सीमेवरच दोन किल्ले होते. यातील शीवचा किल्ला अनेकांना माहीत आहे. पण त्याच्या शेजारी असलेला रिवा किल्ला किंवा रिवा टेहळणी बुरूज मात्र मुंबईकरांच्या विस्मृतीतच गेला आहे. शीव येथे असलेल्या आयुर्वेद कॉलेजच्या आवारातच हा किल्ला आहे. मात्र किल्ल्यावर जाण्याच्या सर्व वाटा आता बंद झालेल्या आहेत. या टेहळणी बुरुजाच्या परिसराचा धांडोळा घेत जाणून घ्या त्याचा इतिहास