कृषी संस्कृतीतून अतिरिक्त धान्य उत्पादन झाले आणि त्यानेच नागरिकणाचा पाया घातला. व्यापार सुरू झाला, मोजमापं- वजनं अस्तित्त्वात आली आणि लिपीदेखील. सम्राटांनी त्यांच्या साम्राज्यासाठी तसेच त्यांचे संदेश नागरिकांपर्यंत सर्वदूर पोहोचवण्यासाठी याच लिपीचा वापर केला. आजही आपल्याला सापडणाऱ्या अनेक शिलालेखांमधून तत्कालीन इतिहासाची माहिती मिळते. मुंबईजवळच नालासोपारा येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखाचा एक भाग सापडला. त्याची पश्चिम भारतातील राजधानी येथेच होते, त्याविषयी अधिक जाणून घेऊ, त्यासाठी निमित्त ठरले आहे ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात सध्या सुरू असलेले ऐतिहासिक संबंध- भारत आणि प्राचीन विश्व हे प्रदर्शन!



