भारतामध्ये १२ ही महिने चित्रपटांची चलती असते. देशाच्या अर्थव्यवस्थेत कितीही उलथापालथ झाली तरी चित्रपट उद्योग मात्र कोट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसतो. यंदाचे वर्षही नेहमीप्रमाचे सिनेसृष्टीसाठी चांगले गेले. परंतु यावेळी भारतीय चित्रपटांबरोबरच हॉलिवूडपटांनी वाहात्या गंगेत हात धुवत कोट्यवधी रुपयांची कमाई केली. या व्हिडीओत आज आपण जाणून घेणार आहोत अशा ५ हॉलिवूडपटांबाबत ज्यांनी प्रदर्शित होताच बॉलिवूडपटांच्याही धंदा चौपट केला.