आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणार विनोदवीर भाऊ कदम आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्याने नुसती हजेरी जरी लावली तरी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं. मात्र प्रेक्षकांना हसविणारा हा कलाकार आज या क्षेत्रात नसता तर त्याने अन्य कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं. हे त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.