अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोनी मराठीवरील आई माझी काळुबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ही मालिका मिळण्यामागे एक योगायोग आहे असं प्राजक्ताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या मुलाखतीत सांगितलं. यासोबतच तिने एक रंजक किस्सादेखील सांगितला आहे.