भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमचं म्हणणं आहे. अशातच चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रू अनावर झाले.