बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात चौथ्या आठवड्यातील आजच्या भागात रक्षाबंधन साजरे होणार आहे. चार आठवड्यांमध्ये अंकिता व धनंजय पवार यांच्यात छान बॉण्डिंग निर्माण झालेलं दिसून आलं. आजही अंकिता कुठल्यातरी कारणाने भावुक होते आणि धनंजय तिला समाजवताना मजेशीर काहीतरी बोलून जातात, ज्यावर स्वतः बिग बॉसच डीपी दादांची मस्करी करताना पाहायला मिळतात. आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहूया