Bigg Boss Marathi Nikki Tamboli Mother Reacts: बिग बॉसच्या घरात आर्या जाधव विरुद्ध निक्की तांबोळी असा वाद सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय मात्र आता आर्याने यामध्ये टोकाचं पाऊल उचलून बिग बॉसच्या घरातील मूलभूत नियम मोडला आहे. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आता घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता निक्कीच्या आईने लेकीची पाठराखण करत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.