मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिवाली परब, अलका कुबल, शशांक शेंडे आणि दिग्दर्शिक अपर्णा होशींग यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. यावेळी शिवालीने या चित्रपटात प्रोस्थेटिक मेकअप केल्यावर सेटवर वावरणं सुरुवातीला किती कठीण गेलं…या सगळ्या प्रक्रियेत अनेक गोष्टी शिकता आल्या असं सांगितलं.