१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गुलकंद’ सिनेमा प्रदर्शित झाला. यानिमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही सगळी सेलिब्रिटी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान, चित्रपटाचं कथानक, स्टारकास्ट याबद्दल गुलकंदच्या टीमने दिलखुलास गप्पा मारल्या.