एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते…अशी ‘सुपर डुपर’ चित्रपटाची कथा आहे. हा सिनेमा ३ एप्रिलला प्रदर्शित होईल. त्यानिमित्ताने दिग्दर्शक समीर पाटील, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, निर्मिती सावंत, हृषिकेश जोशी, ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले या कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थित राहत दिलखुलास गप्पा मारल्या.








