रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. हा संपूर्ण प्रवास रितेशने थोडक्यात ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी गप्पा मारताना उलगडला आहे.






