Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. अखेर लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधताना रितेशने सलमान खान सिनेमात असल्याचं स्पष्ट केलं आहे. याशिवाय सलमान भाऊंनी भूमिकेसाठी स्वत:हून विचारलं होतं, असंही रितेशने स्पष्ट केलं.










