‘अगं आई अहो आई’ या Zee 5 च्या नव्या सीरिजमध्ये प्रेक्षकांना सासू-सुनेचं नेहमीपेक्षा अनोखं नातं पाहायला मिळेल. ‘अगं आई अहो आई’ ही कथा एका नवविवाहित तरुणीची आहे, जी नव्या कुटुंबात स्वतःचं स्थान शोधत असते. ही वेब मालिका नायिकेच्या भावनिक प्रवासाची झलक दाखवते. पुण्यातील तिचं परिचित आयुष्य मागे सोडून ती कोल्हापूरमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, अपेक्षा आणि वातावरणाशी जुळवून घेत असताना ती आपल्या नव्या कुटुंबाशी अर्थपूर्ण नाती निर्माण करते. या कथेच्या केंद्रस्थानी सून आणि सासू यांच्यात हळुहळू विकसित होणारं नातं आहे.
यानिमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला रेणुका शहाणे, निर्मिती सावंत, दिग्दर्शक वरुण नार्वेकर आणि हृता दुर्गुळे यांनी उपस्थिती लावत दिलखुलास संवाद साधला.








