‘मांजर’ सिनेमा येत्या १८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, अश्विनी काळसेकर आणि सयाजी शिंदे अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. आता मांजर म्हणजे नेमकं काय, हे मित्र मिळून काय धमाल करणार याला उलगडा १८ तारखेला होईल. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ताच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास गप्पा मारल्या.









