Entertainment News: सध्या ‘आमने सामने’ नाटक, नाटकातील कलाकार आणि निर्माते या सगळ्यांचीच बरीच चर्चा होतेय. रोहन गुजर व केतकी पालव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि चर्चांना उधाण आलं. त्यांच्या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंटस करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता आमने सामने नाटकाचे निर्माते मंगेश कदम व लीना भागवत यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांची बाजू मांडली आहे. तसेच, त्यांनी थांबण्याचा निर्णय का घेतला, हेही सांगितलं आहे.










