गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन आणि गिरीशच्याच नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि सिनेमातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे सिनेखवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे. या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात सिनेमाचे संगीत आहे.